लग्नानंतर घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दोघांचंही एकमत असणं गरजेचं आहे. यासाठीच आपल्या होणाऱ्या जोडीदाराशी लग्नापूर्वी काही आवश्यक विषयांवर स्पष्टपणे बोलायला हवं. सध्याच्या काळात लग्न ठरवण्याआधी मुलगा-मुलीच्या बऱ्यापैंकी गाठीभेटी होतात, मोकळा संवाद होतो. त्यामुळे काही गोष्टींवर एकमेकांची मतं काय हे जर लग्नाआधीच समजलं तर आपल्या जोडीदाराचे विचारही समजतात आणि निर्णय घेणंही सोपं जातं.

लग्न टिकवायचं असेल आणि वैवाहिक आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी करायचं असेल तर आपल्या पार्टनरला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे जोडीदाराबाबत नीट विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचं असतं. पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांवरचा विश्वास, प्रेम हे तर सगळ्यांत महत्त्वाचं असतंच. त्याचबरोबर विचार जुळणंही गरजेचं असतं. विशेषत: लग्नानंतर घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दोघांचंही एकमत असणं गरजेचं आहे. यासाठीच आपल्या होणाऱ्या जोडीदाराशी लग्नापूर्वी काही आवश्यक विषयांवर स्पष्टपणे बोलायला हवं. सध्याच्या काळात लग्न ठरवण्याआधी मुलगा-मुलीच्या बऱ्यापैंकी गाठीभेटी होतात, मोकळा संवाद होतो. त्यामुळे काही गोष्टींवर एकमेकांची मतं काय हे जर लग्नाआधीच समजलं तर आपल्या जोडीदाराचे विचारही समजतात आणि निर्णय घेणंही सोपं जातं.

१. आर्थिक गोष्टींबाबतचे विचार-

लग्नापूर्वी अनेकदा कपल्स आर्थिक गोष्टींवर बोलायला कचरतात. पण पती-पत्नीच्या नात्यात आर्थिक मुद्दा सगळ्यांत आवश्यक असतो. लग्नापूर्वी स्पष्टपणे मतं न मांडल्यामुळे लग्नानंतर समस्या निर्माण होतात. लग्नाचा खर्च कसा करायचा ते लग्नानंतर घर घेणं किंवा गुंतवणूक या गोष्टींवर स्पष्टपणे बोलणं महत्त्वाचं आहे. दोघांच्या पगारामधून केली जाणारी बचत, घर किंवा गाडीसारखी मोठी खरेदी, पर्यटनासाठीचा खर्च, कर्ज किंवा अगदी निवृत्तीनंतरचा प्लॅन असं सगळं मोकळेपणानं बोललं तर पुढे होणारे मतभेद टाळता येतील.

२. करियरबाबतचे विचार-

लग्नापूर्वी आपापल्या करियरबाबत जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणं अत्यंत गरजेचं आहे. लग्न झाल्यानंतर तो किंवा ती नोकरी बदलणार आहे का किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू ठेवणार आहे का? हे माहिती असणं गरजेचं आहे. विशेषत: मुलींनी आपल्या करियरबाबत स्पष्टपणे बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर मीडिया किंवा फॅशन डिझायनिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात काम करत असाल तर तिथले कामाचे तास, रुटिन कसं वेगळं आहे तिथल्या गरजा, सुट्ट्या याबाबतचे नियम कसे आहेत याची आधीच स्पष्टता जोडीदाराला द्या. लग्नानंतर काहीजणी ब्रेक घेतात किंवा दुसऱ्या शहरात, देशात शिफ्ट होणार असाल तर हा ब्रेक साधारण किती असेल याबद्दलही बोला. एकमेकांची साथ मिळाली तर दोघांनाही आपल्या करियरमधलं ध्येय गाठणं शक्य होतं.

३. पालकत्वाबाबतचे विचार-

पूर्वीपेक्षा आता पती-पत्नीच्या नात्यात बराच मोकळेपणा आहे. त्यामुळे पालकत्वाच्या महत्त्वाच्या मुदद्यावर तर होणाऱ्या जोडीदाराबरोबर बोलायलाच हवं. हल्ली अनेकजण मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे विचार याबाबत काय आहेत हे आधीच जाणून घ्या. मुलं हवी असतील तर लग्नानंतर कधी आणि किती याबाबतही स्पष्टपणे बोलायला हवं. त्याचबरोबर मुलांच्या संगोपनाबाबतही एकमेकांचे विचार जाणून घ्यायला हवेत.

४. कुटुंबाबतचे विचार-

तुमच्या होणाऱ्या जोडीदाराचं त्याच्या कुटुंबाशी नातं कसं आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं आहे की फक्त तुम्ही दोघंच राहणार आहात यावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. हल्ली बहुतेक मुलं-मुली एकटं अपत्य असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी कशी घेणार आहात यावरही विशेषत: मुलींनी आधीच मोकळेपणानं बोलायला हवं. वेगळे राहणार असाल तर वीकएंडला आईवडिलांसोबत राहणार आहात का, हे समजून घ्या. पालकांची आर्थिक जबाबदारी, वैद्यकीय खर्च, अन्य खर्च याबद्दल स्पष्ट मतं नोंदवा.

५. खाण्यापिण्याच्या सवयी-

खरं तर हा मुद्दा अगदी किरकोळ वाटतो, पण त्यावरूनही टोकाचे मतभेद होऊ शकतात. विशेषत: जर दोघेहीजण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक करण्याबाबत आधीच मोकळेपणाने बोलायला हवं. कदाचित तुम्हाला स्वयंपाक करणं आवडत नसेल, पण तुमच्या जोडीदाराला त्याची आवड असेल तर तो किंवा ती स्वखुशीने ती जबाबदारी उचलू शकतो. कुणाला कुकिंगची आवड असते तर कुणाला भाजी आणण्याची, नॉनव्हेज खायला आवडतं की पूर्ण शाकाहारी आहात? एखाद्याला फक्त डाएट फूडच खायची सवय असते तर काहीजण ठरवून व्हेगन झालेले असतात. काहीवेळेस दोघांपैकी एखाद्याला नॉनव्हेजशिवाय जेवण जात नाही तर दुसरा पूर्ण शाकाहारी असतो. आधी बोलणं झालं एकमेकांच्या आवडीनिवडी जपता येतात. दोघेही उशिरा घरी येणार असाल तर जेवणारी सोय करायची वगैरे गोष्टीही आधी ठरवल्या तर नंतर मतभेदाचे प्रसंग टाळले जाऊ शकतात.

६. घरकामाबाबत स्पष्टता-

हल्ली पती-पत्नी दोघेही अर्थार्जन करतात. त्यामुळे स्वयंपाकाबरोबरच घरातल्या कामाचंही विभाजन करणं महत्त्वाचं आहे. घरातलं काम सांभाळण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची नसते. दोघांनी मिळून घरातल्या कामांची वाटणी केली तर बरंच ओझं कमी होतं आणि ताणतणावाचे प्रसंग कमी होतात. लग्नाआधी तुमच्या जोडीदाराच्या घरातल्या कामाबाबतचे विचार आधीच जाणून घ्या. साफसफाई, किराणा सामान आणणे, आठवड्याची कामे, बिलं भरणं, ते अगदी गाडीची देखभाल अशा अनेक गोष्टी असतात. या दोघांनी वाटून घेतल्या तर लग्नानंतर दोघेही ‘फ्री टाईम’ किंवा ‘मी टाईम’ एन्जॉय करू शकतात.

७. लाईफस्टाईल जाणून घेणे-

लग्नानंतर एकमेकांबरोबरच राहायचं आहे, त्यामुळे एकमेकांच्या जीवनशैलीबद्दलही स्पष्टता आधीच असलेलं उत्तम. तुम्ही ज्याच्याबरोबर आयुष्य घालवण्याचा विचार करत आहात त्याला / तिला नेमकी कशी लाईफस्टाईल आवडते? ही गोष्ट जाणून घ्यायला हवी. कदाचित काही गोष्टींमध्ये तुमचे विचार जुळणारही नाहीत, पण एकमेकांशी बोलून या गोष्टींमधला वाद, तणाव टाळता येऊ शकतो.

८. मोकळा वेळेत काय करायला आवडतं?

आठवडाभर नोकरी, प्रवास अशी दगदग केल्यानंतर वीकएंड किंवा सुट्टीच्या दिवशी मिळणारा मोकळा वेळ घालवण्याची तुमच्या जोडीदाराची कल्पना काय आहे? या मोकळ्या वेळेत त्याला एकटं घरीच राहायला आवडतं की बाहेर फिरायला आवडतं? पार्टीज्, मित्र-मैत्रीणींबरोबरच्या ट्रीप्स, सुट्टीच्या दिवशीचं भटकणं याबद्दल आवडीनिवडी आधीच समजल्या तर लग्नानंतर दोघांच्याही आवडीनिवडी जपल्या जाऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पती-पत्नीचे विचार किंवा सगळ्याच आवडीनिवडी जुळतात असं नाही. पण त्याबद्दल आधीच स्पष्टता असली की दोघांनाही एकमेकांना जमजून घेणं सोपं जातं आणि संसारही आनंदाने बहरतो.