मेकअपमध्ये वापरल्या जाणाऱ्या तमाम वस्तूंची नावं आपल्याला समाजमाध्यमांवर वारंवार ऐकायला, वाचायला मिळतात. पण आपण रोज मेकअप करणारे नसू, तर या वस्तूंमधले सूक्ष्म फरक लक्षात येत नाहीत. परिणामी सणावाराला वापरण्यासाठी जेव्हा आपण मेकअप प्रॉडक्टस् घेतो, तेव्हा आपल्या गरजेपेक्षा काहीतरी वेगळंच खरेदी केलं जाण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर लावायचं प्रायमर, फाऊंडेशन, बीबी क्रीम, सीसी क्रीम या जवळपास सारख्याच वाटणाऱ्या वस्तूंमध्ये तर ‘बिगिनर्स’चा हमखास गोंधळ होतो. या लेखात ‘बीबी क्रीम’ आणि ‘सीसी क्रीम’ यातला फरक बघूया.

आणखी वाचा : कौतुकास्पद! २६ वर्षांची तरुणी झाली स्वीडनच्या क्लायमेट खात्याची मंत्री; जाणून घ्या रोमिना पौर्मोख्तरी आहे तरी कोण?

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

‘बीबी’ आणि ‘सीसी’ क्रीम असतं तरी काय?
ही दोन्ही क्रीम्स साधारणत: ‘फाऊंडेशन’सारखीच- म्हणजे त्वचेला मिळत्याजुळत्या रंगांची दिसतात. शिवाय त्यात त्वचेला पोषक ठरतील असेही काही घटक समाविष्ट केलेले असतात, मात्र त्यांचं प्रमाण ब्रॅण्डनुसार बदलतं. ही क्रीम्स ‘मल्टीपर्पज’ आहेत असंही म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला अगदी सगळी मेकअप प्रॉडक्टस् वापरून रीतसर मेकअप करायचा नसेल आणि साधासा ‘लूक’ हवा असेल, तर ‘बीबी’ किंवा ‘सीसी’ क्रीम एकाच वेळी प्रायमर, फाऊंडेशन, मॉईश्चरायझर आणि कन्सीलर या सगळ्या मेकअप उत्पादनांची जागा घेऊ शकेल! म्हणजे एकदा का बीबी किंवा सीसी क्रीम चेहऱ्याला नीट लावलं आणि वरून काॅम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावली, तरी रोजचा मेकअप किंवा घरगुती समारंभांसाठीचा मेकअप रेडी! पण तुमच्या त्वचेचा पोत कसा आहे, यावर तुमच्यासाठी ‘बीबी’ क्रीम चांगलं की ‘सीसी’ क्रीम चांगलं हे ठरतं. त्यामुळे या दोहोंतला बारीक फरक माहिती असणं आवश्यक आहे.

आणखी वाचा : असे का होते, समजून घ्या! गरोदर असल्याचे कळले आणि… ४८ तासांत बाळही जन्मास आले

‘बीबी’ क्रीम
‘बीबी क्रीम’मधला ‘बीबी’ म्हणजे ‘ब्लेमिश बाम’ किंवा ‘ब्यूटी बाम’. ज्याच्या नावातच ‘बाम’ आहे ते प्रॉडक्ट त्वचेला ओलावा- मॉईश्चर देणार हे नक्की. शिवाय नावाप्रमाणेच चेहऱ्यावर असलेले बारीक बारीक डाग- ‘ब्लेमिशेस’ लपवण्यासाठी ‘बीबी क्रीम’ काही प्रमाणात ‘कव्हरेज’ देतं. त्याला ‘शिअर कव्हरेज’ असंही म्हणतात. म्हणजे फाऊंडेशनचा चेहऱ्यावर लावलेला थर जसा जाडसर आणि जास्त कव्हरेज देणारा असतो, त्याच्या तुलनेत बीबी क्रीमचा थर पातळ पसरलेला असतो. याच कारणामुळे बीबी क्रीम लावल्यानंतर लूक नैसर्गिक दिसतो. चेहऱ्यावर काही भारंभार थापलं आहे, असं वाटत नाही. म्हणजेच तुम्हाला मेकअप करण्याची सवय नसेल, तर बीबी किंवा सीसी क्रीम वापरणं तुमच्यासाठी अधिक सोपं आहे. त्यात मेकअप फसण्याची शक्यता फारच कमी.

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

‘सीसी’ क्रीम
‘सीसी क्रीम’मधला ‘सीसी’ म्हणजे ‘कलर कंट्रोल’ किंवा ‘काॅम्प्लेक्शन करेक्टर’. आता हा ‘कलर कंट्रोल’ कुठला, तर चेहऱ्यावर त्वचेच्या रंगात- अर्थातच ‘स्किन टोन’मध्ये काही कमी-अधिकपणा असेल, तर ते लपवायला ‘सीसी क्रीम’ वापरलं जातं. डोळ्यांखालची काळी वर्तुळं, चेहऱ्यावरचे पिंपल्सचे डाग वगैरे लपवण्यासाठी सीसी क्रीमचा पातळ थर उपयुक्त ठरतो. हेही ‘शिअर कव्हरेज’च आहे हे लक्षात घ्या, पण हे कव्हरेज ‘बीबी क्रीम’पेक्षा काहीसं अधिक असतं. ‘सीसी क्रीम’ हे ‘बीबी क्रीम’पेक्षा पातळ किंवा ‘लाईट’ असतं आणि ते काही प्रमाणात ‘मॅट फिनिश’ देतं.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक

त्वचेचा पोत बघा
तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल, की ‘बीबी’ आणि ‘सीसी’ क्रीमच्या गुणधर्मांमध्ये काही सूक्ष्म फरक आहेत, तरीही त्यांचं काम जवळपास सारखंच वाटतंय! आता पाहा, की तुमच्या त्वचेचा पोत कसा आहे? तुमची त्वचा कोरडी आहे की तेलकट? वर पाहिल्याप्रमाणे ‘बीबी क्रीम’ मॉईश्चर देतं, त्यामुळे त्वचा कोरडी असेल, तर बीबी क्रीमचा चांगला उपयोग होऊ शकेल. त्याचप्रमाणे ‘सीसी क्रीम’ काही प्रमाणात ‘मॅट फिनिश’ देतं हेही आपण पाहिलं. त्यामुळे त्वचा तेलकट किंवा नेहमी पिंपल्स होणारी असेल, तर लाईट असं सीसी क्रीम चांगलं ठरेल.

आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?

असं असलं, तरी प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि अनेकदा त्वचेचा पोत मिश्रही असू शकतो. त्यामुळे आपल्याला कोणतं क्रीम ‘सूट’ होईल हे खूपदा प्रत्यक्ष वापरून पाहिल्यावरच समजतं आणि तेच योग्य. तुम्हाला ‘बीबी’ क्रीम चालेल की ‘सीसी’ क्रीम, हे एकदा समजलं, की मात्र रोजच्या ‘नॅचरल मेकअप लूक’साठी एक छान मेकअप प्रॉडक्ट तुमच्या संग्रहात समाविष्ट होईल.