गेल्या दोन-तीन वर्षात जगात इतकं काही घडलंय की आता कोणतीच गोष्ट आपल्याला चकीत करत नाही. लोकांना आता चित्रविचित्र घटनांची इतकी सवय झाली आहे की काहीशी साधारण घटना त्यांचं लक्ष वेधून घेण्यास पुरेशी नसते. पण काही गोष्टी मात्र इतक्या कालातीत असतात की त्या कोणत्याही कालपटलावर सहज लोकांचं लक्ष आकर्षित करतात.

अशीच एक घटना आहे मागील महिन्यातील. आजकालच्या बातम्यांचं आयुष्य पाहता तशी शिळी होऊन निर्जीव झालेली बातमीच आहे ही, पण त्यातला गाभा मात्र काही शतकं तसाच ताजा आहे, त्यामुळे या बातमीची चर्चा जरी आता शमली असली तरी विषय तसाच तेवता आहे.

Success Story Meet Ayush Goel
Success Story: युपीएससीसाठी सोडली २८ लाख रुपयांची नोकरी; ‘या’ पॅटर्नने अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात मारली बाजी
neet student marathi news
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट
A unique answer written by a school student
शिक्षक नंबरी, विद्यार्थी दस नंबरी; शाळेतल्या विद्यार्थ्याने लिहिलेलं हे उत्तर कुठेही वाचलं नसेल; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Umed Sankalp Project, Umed Sankalp Project Rescues Two Sisters, Rescues Two Sisters Forced to Beg in wardha, Pass SSC Exams with Good Grades, wardha news
भीक मागायला चल म्हणत आईवडिलांनी बेदम बदडले; तरीही ‘चंद्रमुखी, मुस्कान’ चमकल्याच… दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश
10th result, quality,
दहावीचा निकाल गुणवत्ता ठरवणार आहे का?
Shyam Manohar, Shyam Manohar's stories, Deep Societal Insights, story on contemporaray situation, story on contemporaray political situation, lokrang article, loksatta lokrang,
म्हणा…
Verification teachers Appointment, 645 Teacher Candidates, Rayat Shikshan Sanstha, Demand Immediate Resolution, Education Commissioner, Teachers recruitment, Maharashtra government,
निवड होऊनही शेकडो शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत! काय आहेत कारणे जाणून घ्या…
CBSE 11th 12th Exam Pattern Changed
११ वी, १२ वीच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल! प्रश्न व गुणांची टक्केवारी कशी बदलणार? CBSE समोर आव्हान काय?

तर झालं असं की जगातला सर्वात आनंदी देश म्हणून गौरवल्या गेलेल्या फिनलॅंड देशाच्या पंतप्रधानांचा एक खाजगी व्हिडिओ लीक झाला आणि समाजमाध्यमांद्वारे सर्वदूर पसरला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान, सना मरीन या त्यांच्या काही मित्रमंडळींसोबत पार्टीमध्ये नाचगाणी करताना दिसत आहेत. सना मरीन २०१९ मध्ये फिनलॅंडच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. त्यावेळी त्या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान होत्या. त्यांच्या या व्हिडिओवर बरीच चर्वितचर्वणं झाली. मरीन यांनी स्वतः लोकांसमोर येऊन याबाबतचे मत प्रकट केले. या घटनेनंतर विराधी पक्षाने त्यांना ड्रगटेस्ट घेण्यासही सुचवले. मरीन यांनी ती मान्य केली आणि ती टेस्टही करुन घेतली. त्यांनी आधी नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी पार्टीत कोणतेही ड्रग्स घेतले नव्हते यावर टेस्टने शिक्कामोर्तब केले.

आणखी वाचा : करिअर-घर बॅलन्स : “आमचं स्टारपण उंबरठ्याबाहेर ठेवून घरात येतो”: निवेदिता सराफ

मरीन यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत याही पूर्वी अशाच काही प्रसंगाना सामोरे जावे लागले होते. याआधी एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये त्यांना त्यांच्या कपड्यावरुन बऱ्याच टीकेला तोंड द्यावे लागले होते. अजून एका घटनेत कोविड काळात लोकांनी भरलेल्या भरगच्च क्लबमध्ये नाचतानाचा त्यांचा फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि त्या लोकप्रक्षोभाच्या बळी झाल्या. नंतर एका मुलाखतीत त्यांनी आपलं ते वागणं चुकीचं असल्याचं कबूल करत तेव्हा काळजीपूर्वक वागायला हवं होतं असं म्हटलं.

मरीन या एक हुशार आणि कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. कोविड सारख्या आपत्तीला देशात अतिशय कुशलतेने सांभाळण्यासाठी तसेच नुकत्याच नाटो या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सदस्यत्वाची मागणी करण्याचा निर्णय यासाठी त्या चर्चेत होत्या.

खरंतर प्रसिद्ध व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी म्हणा, त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामगिरीपेक्षा लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात अधिक स्वारस्य असते. आणि याबद्दल खरंतर आपण सगळेच अपराधी आहोत. जर तसं नसतं तर अतिरंजित आणि लक्ष वेधून घेणा-या मथळ्यासकट येणाऱ्या ‘पेज थ्री’ बातम्यांचा खप कधीच इतका नसता. त्यांच्या खाजगी आयुष्यातील लोकांचं स्वारस्य हे खरंतर झालं एक सद्यस्थितीबद्दलचे विधान पण याचा अजून पुढे जाऊन विचार केला तर लक्षात येते की अशा बातम्यांना आणि पर्यायाने त्या व्यक्तीला, तिच्या पुरुष किंवा स्त्री असण्याने वेगळी वागणूक मिळते. मरीन यांच्याबाबत घडलेला हा प्रसंग हे याचंच ताजं उदाहरण.

आणखी वाचा : कपडे चिकटवणारी ‘बॉडी-क्लोदिंग टेप’!

खरंतर एका लोकप्रतिनिधीची कार्यकुशलता आणि क्षमता ही त्याच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातील योगदानातून पारखली गेली पाहीजे. फिनलॅंडसारख्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशाकडून तरी किमान हीच अपेक्षा केली जात होती. मात्र तिथल्याही पंतप्रधानांना लोकांसमोर येऊन पाणावलेल्या डोळ्यांनी, लोकप्रतिनिधींना सुद्धा खाजगी आयुष्य असतं आणि त्यात मिळणारा मोकळा वेळ ते त्यांच्या मित्रमंडळीसह व्यतीत करु शकतात असं सांगावं लागलं. या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहताना समाजाकडून स्त्री आणि पुरुषाला मिळणाऱ्या वागणूकीमधील तफावत अगदी सहज दिसून येते. “पुरुष असता तर इतका गह़जब केला असता का या गोष्टीचा..” त्याचबरोबर “मुळात तिने हा व्हिडीओ काढायलाच का दिला, सोशल मीडियावर गेला की होणारच ना तो व्हायरल.” अशी मतमतांतर कानावर पडतात.

मुळात कोणत्याही समाजाला, मग तो मागास असो की प्रगत, त्यांचा नेता किंवा किमान त्याची प्रतिमा ही आदर्शवतच हवी असते. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य तत्कालीन उच्च मूल्यांना आणि तत्त्वांना वाहिलेले असायला हवे, अशी समाजाची कायम अपेक्षा असते. त्यांचं आयुष्य हे सतत ‘public trial’साठी खुलं असतं. हे असं जरी असलं तरी पुरुष नेत्यांना किमान या नैतिक फूटपट्टीतून ‘moral policing’ मधून बव्हंशी सूट मिळालेली असते. ‘रंगेल आहे जरासा, पण काम धडाडीने करतो.’ असं बोलून आपण तो विषय तिथेच संपवलेला असतो. पण हाच नियम स्त्रियांना मात्र तितकासा लागू होत नाही. मुळात स्त्रियांनी राजकारणात येणं आणि जबाबदारीच्या उच्चपदांवर कामं करणं हे ब-याच ठिकाणी आजही तितकंसं स्वीकारलंच गेलं नाहीये. अशात ती स्त्री जर एखादी राष्ट्रप्रमुख असेल तर मात्र तिने आदर्शवादाचे सगळे उच्चांक मोडीत काढणं गरजेचं आहे.

स्त्री-पुरुष असमानता हा शतकानुशतकं चर्चेत असणारा विषय आहे. एक समाज म्हणून आपण या दोन लिंगधर्मींमधील सामाजिक समानता स्वीकारायला तयार आहोत का हा ज्याने-त्याने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. या निमित्ताने समाजमध्यमांच्या दोन वेगळ्या छटा पाहावयास मिळाल्या. ज्या समाजमाध्यमांद्वारा मरीन यांचा व्हिडिओ पसरला त्याच समाजमाध्यमांमधून त्यांना जगभरातील स्त्रियांकडून साथसुद्धा मिळाली. या घटनेनंतर अनेक स्त्रियांनी #solidaritywithsanna आणि #istandwithsanna हे हॅशटॅग्स वापरुन त्यांचे नाचतानाचे व्हिडिओज् समाजमाध्यमांमधे पोस्ट केले.

ही घटना एक स्वतंत्र प्रसंग म्हणून पाहण्यात काही अर्थ नाही, तिचा गाभा खरंतर खूप खोलवर मुरलेला आहे, तो जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत अशा अनेक सना मरीनना अशा अग्निपरीक्षा देण्यावाचून पर्याय नाही.