अर्चना मुळे

रिया आणि रिमा दोघी एका हाॅटेलमधे वाॅशरूमसाठी गेल्या होत्या. जाताना त्यांना कुणी अडवलं नाही, पण त्या जेव्हा बाहेर आल्या आणि काहीही न खाता-पिता निघाल्या तेंव्हा हाॅटेल कर्मचाऱ्यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तो दोघींजवळ गेला. त्यांना म्हणाला, “तुम्ही आत्ता वाॅशरूमला जाऊन आलात ना?”

Unnatural intercourse, husband,
पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा

“ हो, का? काय झालं?”

“ काही नाही, तुम्ही चहा नाष्टा काही घेणार का? ”

“ नाही नाही, आम्ही फक्त वाॅशरूमसाठी आत आलो होतो.”

“ मॅडम, हे काय सुलभ शौचालय वाटलं का तुम्हाला?”

“ नाही. असं काही नाही. आम्ही खूप लांबून आलो. इथं आसपास काहीच नाही. हे हाॅटेल दिसलं म्हणून आलो.”

“ हो ना… मग बरोबर आहे. हे हाॅटेलच आहे. नाष्ट्याचे सगळे पदार्थ तयार आहेत. तुम्हाला हवं ते खा. सगळं गरमगरम. सांगा काय आणू?”

“आम्हाला खायला काहीच नकोय.”

“ पण इथं काहीही न खाता पिता फक्त वाॅशरूमला जायला परवानगी नाही.”

“ तसं असेल तर वाॅशरुमच्या दरवाज्यावर ‘फक्त हाॅटेलमधील ग्राहकांसाठी’ असा बोर्ड लावा. म्हणजे आमच्यासारख्या बाहेरून अवघडलेल्या अवस्थेत येणाऱ्यांनाही कळेल. हे आपल्यासाठी नाही म्हणून.”

“ इतकंही न कळण्याइतक्या अडाणी, अशिक्षित तुम्ही नाहीत.”

“ आम्हाला काही खायचं नाही. आम्हाला जाऊ द्या. या रस्त्यावर लांबपर्यंत कुठेही वाॅशरूम नाही. खूप कंट्रोल करत आम्ही इथपर्यंत आलो होतो. खरंतर तुमचे धन्यवाद मानून आम्ही निघणार होतो. पण तुम्ही तर आम्हाला चांगलंच कोंडीत पकडलं.”

“आम्हाला पण धंदा पाणी आहे. कुणीही येऊन आमच्या वाॅशरूमचा वापर करेल आणि निघून जाईल. त्यासाठी पाणी, वीज, स्वच्छतेचा काही खर्च असतो. त्याचं काय करायचं आम्ही?”

“हे बघा, आम्ही तुमचं शौचालय वापरलं त्याचे हवं तर इतर ठिकाणी घेतात त्याप्रमाणे दोघींचे दहा रुपये देतो. पण तुम्ही काही खाण्याचा हट्ट करु नये इतकंच.”

रिया, रिमा यांचा भाऊ तन्मय बाहेर गाडीतच थांबला होता. या दोघींना लागणारा वेळ बघून तो हाॅटेलमधे आला. या दोघी गाडीत होत्या तेव्हा वाॅशरुमसाठी त्यांच्या झालेल्या अवस्थेपेक्षा आत्ताची त्यांची अवस्था जास्त वाईट झाली होती. कारण हाॅटेलमधील सगळे ग्राहक, कर्मचारी, येणारे जाणारे सगळे त्यांच्याकडे खूप मोठा गुन्हा केल्यासारखे बघत होते. त्यांच्यातही अपराधी भावना निर्माण झाली होती, परंतु वाॅशरुमसाठी दुसरा कुठलाच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. तन्मयच्या लक्षात सारी परिस्थिती आली. त्याने हाॅटेलच्या मॅनेजरला बोलवलं. तन्मयच्या एका जवळच्या मित्राचं त्याच्या शहरात एक हाॅटेल होतं. त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी हाॅटेलच्या बाहेर वाॅशरुम्सची सोय केली होती. आजकाल बरीच हाॅटेल्स अशा सुविधा करतात. त्याचं कारणही ग्राहक न्यायालयाचा कायदा आहे. हे त्याला माहीत होतं.

हेही वाचा… सत्ता तालिबानची: पारतंत्र्य स्त्रियांचे!

तो मॅनेजरला म्हणाला, “सर, एक म्हणजे तुम्ही या स्त्रियांना विनाकारण असं वेठीला धरु शकत नाही. या माझ्या बहिणी आहेत. त्यांना खरंच खूप त्रास होत होता म्हणून या इथं आल्या. आम्ही काहीतरी खाल्लंही असतं, पण आत्ता आम्हाला भूक नाही. तरी तुम्ही खा खा म्हणत असाल तर शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे आम्ही तुमचे आत्ताचे ग्राहक जरी नसलो तरी मोफत पाणी आणि नि:शुल्क वाॅशरूम सेवा अगदी फाइव्ह स्टार हाॅटेल्सनी सुध्दा कोणत्याही गरजूंना दिली पाहिजे, असा ग्राहक न्यायालयाचा कायदा आहे हे मी तुम्हाला आत्ता समजावून सांगत बसू की आम्ही निघू?”

तो पहिला कर्मचारी मधेच बोलला, “तुम्ही कोर्टाची काय भाषा करताय? तुम्ही वाॅशरूमसारख्या गोष्टीला कायद्यापर्यंत काय घेऊन जाताय? थोडंसं खा म्हटलं तर अशी काय मोठी चूक झाली?”

हे ऐकून रिया जरा चिडूनच बोलली, “एकतर तुम्हाला आमची हालतच समजून घ्यायचीच नाही आहे.”

इतका वेळ शांत असलेली रिमा तन्मयला म्हणाली, “चला इथून, इथे वाद का घालतोय आपण? यांना स्त्रियांसाठी गरजेला वाॅशरुम मिळणं किती महत्वाचं असतं हे कधीच कळणार नाही.”

ती त्या कर्मचाऱ्याला म्हणाली, “ उशिरपर्यंत वाॅशरुम कुठे मिळत नाही ना तेव्हा आमची काय हालत होते हे तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही.”

हेही वाचा… गच्चीवरची बाग: बाग फुलवताना…

मॅनेजर शांतच होता. कारण खरी परिस्थिती अशी होती की, वाॅशरुमसाठी कुणी हाॅटेल मालक जबरदस्तीने सेवा शुल्काचा आग्रह धरत असेल तर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन नंबर ‘१९१५’ या क्रमांकावर तक्रार करता येते. शिवाय ग्राहक आयोगाकडे ऑनलाइन पध्दतीने edaakhil.nic.in (इ दाखील) या वेबसाइटवर तक्रार नोंद करता येते. हॉटेल मालकाला याची माहिती नव्हती. मॅनेजरने या तिघांना थोडं थांबायला सांगितलं. तो हाॅटेल मालकाकडे गेला. मालकांना घडलेली घटना सांगितली. मालकाने या तिघांनाही आत बोलवलं. चहा सांगितला. हाॅटेल व्यवस्थापनाच्यावतीने तिघांची माफी मागितली. हाॅटेल मालकाने सरसकट सर्व लोकांना वाॅशरूम सहज वापरू दिल्याने येणाऱ्या अडचणी सांगितल्या. शिवाय बाहेर इतर सर्व प्रवाशांसाठी लवकरच वाॅशरूमची सोय करणार असल्याचं सांगितलं.

रिया, रिमाचा प्रश्न सुटला आणि अशा अनेक जणींची सुटका करणारा हा ग्राहक कायदा नक्कीच उपयोगी ठरणारा आहे.

archanamulay5@gmail.com