आराधना जोशी

‘घर’… आपलं हक्काचं ठिकाण. सर्वात सुरक्षित, उबदार, संरक्षण देणारं आपलं घर प्रत्येकालाच हवं असतं. मात्र या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या घरात होणारे अपघात टाळणं आणि त्यातही जर लहान मुलं घरात असतील तर या अपघातांपासून त्यांचं रक्षण करणं ही पालक म्हणून खूप मोठी जबाबदारी असते; कारण अपघात हे कधीही पूर्वसूचना देऊन घडत नसतात. त्यामुळे पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली तर घरात घडून येणाऱ्या अनेक दुर्दैवी घटना आपण टाळू शकतो.

Loksatta chaturang article about children who think they own their parents money
सांदीत सापडलेले…! मालक कोण?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
Is surgery necessary for the problem of uterovaginal prolapse
स्त्री आरोग्य : ‘अंग’ बाहेर येणं समस्येसाठी शस्त्रक्रिया करावीच लागते का?
It is very important for society and family to be vigilant to stop incidents like rape
बदलापूर, पश्चिम बंगालसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी एवढे करावेच लागेल!
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज

घरात लहान मुलं असली की दंगामस्ती, गडबड, बडबड या गोष्टी ओघाने येतातच. एका जागी शांत न बसता सतत काहीतरी उद्योग करत राहणे हा त्यांचा आवडीचा खेळ असतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणाऱ्या व्यक्तींचा शारीरिक आणि मानसिक क्षमतांची परीक्षा बघणारा असतो. आपलं हे घरकुल सुरक्षित राहावे किंवा त्यात राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी आपण विमा उतरवत असतो. पण घरातल्या काही गोष्टींकडे पालक म्हणून योग्य वेळी लक्ष दिले, काही गोष्टींची योग्य वेळेत डागडुजी केली तर घरात होणारे – विशेषतः मुलांच्या संदर्भात – अनेक लहान मोठे अपघात सहजपणे टाळता येतात. ते कसे यासाठी खालील मुद्द्यांचा विचार होणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!

हे मुद्दे ध्यान्यात ठेवा

१) घरातील सर्वात धोकादायक ठिकाण म्हणजे बाथरूम. बर्‍याच मुलांना आंघोळ करणे आवडते. पाणी उडवत, पाण्यात खेळत, त्यात डुंबत आंघोळ करणे ही त्यांच्यासाठी पर्वणीच असते. पण जर त्यांना बाथरूममध्ये देखरेखीखाली ठेवले नाही तर त्यामुळे अपघात होऊ शकतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक सॉकेट्स, इतर विद्युत उपकरणे मुलांच्या आवाक्यापासून दूर किंवा लॉक असलेल्या कॅबिनेटमध्ये ठेवा.

२) बाथरूमचे फ्लोअरिंग निसरडे तर नाही नं याची खात्री करा. तसे असेल तर हल्ली बाजारात ॲन्टी स्लीप मॅट्स मिळतात. त्यांचा वापर करा.

३) बाथरूमसाठी वापरली जाणारी केमिकल्स, विविध औषधे शक्यतो मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा जागी ठेवा.

४) गिझर, हीटर आणि घरातील इतर इलेक्ट्रीक गोष्टी यांचे अर्थिंग नीट तपासून घ्या. मुलांच्या आंघोळीसाठी गरम पाणी काढले असेल तर शक्यतो मुलांना तिथे एकटे सोडून बाहेर जाऊ नका. आंघोळीची आवश्यक ती पूर्ण तयारी करून मगच गरम पाणी काढा. पाणी साठवण्याच्या बादल्या, ड्रम यांची झाकणे नीट घट्ट बसणारी आहेत का हे तपासा.

५) खेळण्यांची निवडही विचारपूर्वक करा. खूप लहान लहान सुटे भाग असणारी खेळणी शक्यतो मुलांना खेळायला देऊ नयेत. द्यायची झाली तर पालकांच्या देखरेखीखाली मुलांना ती खेळणी द्या. सॉफ्ट टॉईजही नियमितपणे स्वच्छ केली जातील याची पालकांनी काळजी घ्यावी. अन्यथा त्यात साठत राहिलेल्या धुळीमुळे मुलांना त्रास होतो.

हेही वाचा >> सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?

६) घरातील फर्निचर – सोफा, खुर्च्या, टी पॉय, शोकेस यांच्या कडा टोकदार नसाव्यात, तर गोलाकार असाव्यात. जेणेकरून मुलांना या कडा लागणार नाहीत. पण जर या कडा टोकदार असतील तर हल्ली बाजारात उपलब्ध असणाऱ्या बबल रॅप्सनी या कडा कव्हर कराव्यात. उंच खुर्च्या, बेड यावर मुलांना एकटे सोडून जाऊ नका. तोल जाऊन मुलं खाली पडण्याची, अपघात होण्याची शक्यता असते.

७) चष्मा, छोटे आरसे, कात्री, चाकू, सुऱ्या, दोरी  यासारख्या गोष्टींबरोबर खेळायला मुलांना खूप आवडते. मात्र या गोष्टी त्यांच्या नजरेआड ठेवाव्यात. शेंगदाणे, बेरी, बिया, पॉपकॉर्न यासारख्या गोष्टी पालकांनी आपल्या नजरेसमोर असताना मुलांना द्याव्यात. म्हणजे नाकात, कानात या वस्तू मुले घालणार नाहीत.

८) स्वयंपाकघरातील काचसामान मुलांच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवावे. तिथल्या ट्रॉलीजमध्येही सामान ठेवताना शक्यतो मुलांना अपघात होणार नाही अशाप्रकारे ठेवावे. शक्य असेल तर तिथल्या कपाटांना चाइल्ड लॉक लावावीत. तिखट, मीठ, मसाले, विविध पीठे मुलांपासून दूर ठेवावीत.

९) तुम्ही उंचीवरच्या मजल्यावर राहात असाल तर गॅलरीमध्ये मुलांना एकटे सोडून जाऊ नका किंवा गॅलरीला ग्रील बसवून घ्या. म्हणजे मुलं खाली वाकून बघण्याचा धोका निर्माण होणार नाही.  याशिवाय घरातील दारांच्या कड्या किंवा डोअर स्टॉपर शक्यतो मुलांचा सहज हात पोहोचणार नाही अशा जागी असावेत.  घराची एक अतिरिक्त किल्ली आपल्या शेजाऱ्यांकडे अवश्य ठेवावी. आपात्कालीन परिस्थितीत त्याची गरज भासते.

१०) याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना अनोळखी व्यक्तींशी का बोलू नये ते सांगा. जर एखादी अनोळखी व्यक्ती वारंवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल – विशेषत: मुलं एकटी असताना – तर ते लगेच तुम्हाला सांगायचे हे मुलांना शिकवा. योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श यातला फरक मुलांना शिकवा. जेणेकरून घरी आलेल्या किंवा असलेल्या व्यक्तींकडून होणाऱ्या मुलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालता येईल. जर गरज असेल तर घरात सीसीटीव्ही बसवून घ्यावेत. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याची मोठी मदत होते.

घर चांगलं असावं, सुंदर असावं, स्वच्छ असावं, सर्व सुखसोयींनी युक्त असावं, यासोबतच अशा घरात मुलांचा किलबिलाट असेल, हसणं असेल तर त्या घराला चार चांद लागत असतात. हे हास्य असंच कायम ठेवण्यासाठी पालकांनी घरातील अपघात कसे टाळता येतील याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे.