मागच्या लेखात आपण घरातील उपलब्ध वस्तूंपासून कुंडी कशी भरायची ते पाहिलं. या लेखात आपण आपल्या छोट्या बागेची मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत. जर तुमच्याकडे अगदीच कमी जागा आहे, अगदी एखाद्या छोट्या खिडकी खालची ग्रील म्हणा किंवा एखादा छोटा कोपरा म्हणा असं काही तर काय करायचं ते पाहू. तेवढी छोटी जागाही आपल्या बागेला पुरते अगदी खात्रीने.

जर या कोपऱ्यात किंवा ग्रीलमध्ये पुरेसं ऊन येत असेल तर आपण काही फुलझाडं इथे लावू शकतो. कारण फुलं नेहमीच आनंद देतात. मन प्रसन्न करतात. हीजी काही फुलझाडं आपण निवडणार आहोत ती ऋतू कोणता चालला आहे त्याप्रमाणे निवडणार आहोत. यामुळे एकतर त्यात वैविध्य राहतं आणि आपल्याला एक निखळ प्रसन्नता लाभते.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
Fab Over 50 These Women Are Rocking The Instagram Influence's Game
पन्नाशी ओलांडलेल्या महिला इंन्फ्युएन्सर्स! वयाची चौकट मोडून निर्माण केलं स्वत:चे स्थान, पाहा कोण आहेत त्या?
fenugreek, fenugreek methi in the garden
निसर्गलिपी: ताजी ताजी भाजी…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Pushpalata, Decoration
निसर्गलिपी: पुष्पलता
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
is mangalsutra necessary to wear after marriage
Mangalsutra : लग्नानंतर मंगळसूत्र नाहीच घातलं तर…? स्त्रीधन महत्त्वाचं, पण नेहमी का घालायचं?

हेही वाचा – व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे

सध्या उन्हाळा चालू आहे. या दिवसांत मोगरा, संक्रांत वेल, अबोली, कोरांटी, सदाफुली यांसारखी फुलझाडं लावणं उत्तम. यातील अबोलीच्या बिया, कोरांटीची रोपं सहजी मिळतील. ती मुद्दामहून काही विकत आणायला नको. अबोलीत हिरवा, निळा असे सुरेख रंग मिळतात. आपण आपल्या आवडीप्रमाणे रंग निवडून ती एका छोट्या कुंडीत लावावीत. यात दोन-तीन रंगांची एकत्र लागवडसुद्धा करता येते. अबोली ही झुडूप वर्गीय वनस्पती असल्यामुळे ती आपल्या छोट्या जागेसाठी योग्यच होईल. कोरांटी ही खरं तर वईला म्हणजे कुंपणाला लावली जाते. यात अनेक सुंदर रंग बघायला मिळतात. आपल्या आवडीप्रमाणे रंग निवडून आपण अबोली आणि कोरांटीच्या नाजूक फुलांची वेगळी रंगसंगती साधू शकतो. सदाफुलीमधील राणी, पांढरा हे रंग आपण नेहमीच बघतो, पण या व्यतिरिक्त गडद जांभळ्या, हलका गुलाबी, एक-दोन मिश्र छटा असलेली सदाफुलीही असते. यात काही सुरेख रंगाच्या मिनीएचर व्हरायटीसुद्धा नर्सरीमध्ये मिळतात. फारशी देखभाल न करताही सदाफुली उत्तम फुलते. अगदी रोज भरपूर फुलं देते. तगर ही अशीच एक. तगरीमध्ये सिंगल तगर, डबल तगर, मिनीएचर असे कितीतरी प्रकार लावता येतात. या फुलझाडांची वैशिष्ट्य म्हणजे ही बागेला एक रंगीत रूप तर देतातच, पण जर का फुलं देवपूजेसाठी वापरायची असतील तर तेही काम होतं.

मोगरा आणि त्याचा सुगंध तर सगळ्यांना परिचित आहे. या मोगऱ्यामध्येही सिंगल मोगरा, डबल मोगरा, मदनबाण, हजारी मोगरा असे अनेक प्रकार असतात. उन्हाळ्यात मोगऱ्याची उत्तम छाटणी केली तर तो जोमाने वाढतो. पुरेसं पाणी, वाळलेलं शेणखत, जोडीला थोडंफार मिळालं तर कंपोस्ट वापरून मध्यम आकाराच्या कुंडीत मोगरा लावायचा. जसजशी फुलं येऊन जातील तशी छाटणी करत राहायची. उन्हाळा आणि मोगरा यांचं नातं अतूट आहे. माझ्या लहानपणी आम्ही मोगऱ्याची ताजी फुलं माठातल्या पाण्यात घालत असू. ते मोगऱ्याच्या वासाचं थंडगार पाणी प्यायला फार मस्त वाटायचं.
संक्रांत वेल ही खरं तर बाराही महिने फुलते आणि आनंद देते. यात रंगही फार सुरेख मिळतात. जागा जर भरपूर असेल तर कुंपणाला, कमानीवर, भिंतीलगत ही लावणं जास्त फायदेशीर ठरतं. पण छोट्या कुंडीतही ती उत्तम वाढते. आपल्याला हवा तो आकार राखण्यासाठी छाटणी मात्र सतत करायची. संक्रात वेलीला ट्रंपेट किंवा हनीसकल अशीही नावं आहेत. यात फुलांच्या आकारात आणि रंगातही वैविध्य आढळून येतं. पण बागेला रंगीत रूप देण्यासाठी हीची निवड नक्की करावी.

हेही वाचा – “बालसंगोपन रजा नाकारणं म्हणजे घटनेचं उल्लंघन”, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणावरून फटकारले!

या व्यतिरिक्त मनी प्लांट, रीबीन ग्रास अशा काही हिरवा तजेला देणाऱ्या वनस्पतीही आपण निवडू शकतो. यात फॉर्च्यून प्लांट म्हणजेच जेड हाही उत्तम पर्याय आहे. काहीशी मांसंल पानं असलेली अगदी कमी पाण्यावर वाढणारी ही वनस्पती आहे. थोड्या कल्पकतेने आपण अगदी छोट्या बाऊल किंवा शंखातसुद्धा या वनस्पती लावू शकतो. मग जेव्हा हवं तेव्हा त्यांचा सेंटर टेबलवर सजावटीसाठी वापर करता येतो.

सहज उपलब्ध होतील आणि कमी श्रमात वाढवता येतील अशी ही फुलझाडं आहेत. यांचा जरुर वापर करा आणि आपल्या घरातला एक हिरवा कोपरा सजवा. झाडं वाढवताना त्यांचं शास्त्र जर समजून घेतलं तर त्याविषयीची सजगता वाढते. त्यासाठी माणूस आणि झाडं हे निळू दामले यांच पुस्तकं आवर्जून वाचा.

mythreye.kjkelkar@gmail.com