एकत्र राहून कोंडमारा होतोय?’ हे शीर्षक वाचून एकदम हे आपल्याबद्दल लिहिलं की काय , असं वाटत असेल तर हो, हा लेख तुम्हा सर्वांसाठी आहे. आपण अशा समाजात राहतो जिथे ‘आम्ही वेगळं राहतो’ म्हणणाऱ्यांकडे काहीशा उत्सुकतेने, असुयेने तर काहीशा साशंकतेने बघितलं जातं.

हेही वाचा- चॉइस तर आपलाच : घरातले लोक असं का वागतात?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

असूया यासाठी, की असं यांच्यासारखं सुटसुटीत मोकळं आपल्यालाही राहायला मिळावं ही अनेकांची सुप्त इच्छा असते. आणि साशंकता यासाठी की, ‘यांचं आपापसात जमत नाही वाटतं’ हा किडका विचार. एकमेकांशी जमत नसताना वेगळं होण्याची हिम्मत नसणारे किंवा तशी परिस्थिती नसणारे मात्र अशा ‘सुटवळ’ जोडप्यांमध्ये कुतूहलाने बघतात की यांनी हे जमवलं कसं? जी कुटुंबं अत्यंत प्रेमाने एकत्र राहातात त्यांच्या बद्दल संपूर्ण आदर ठेवून सांगावंसं वाटतं, की दुर्दैवाने मारून मुटकून, मनाचा कोंडमारा करत एकत्र राहणाऱ्या कुटुंबांची संख्या खूप जास्त आहे.

अनेक प्रयत्न करूनही एखाद्या घरात मुलाचं वडिलांशी, भावाचं भावाशी, किंवा सुनेचं सासुशी अजिबात पटत नसताना केवळ सामाजिक दबाव म्हणून एकत्र राहावं लागत असेल तर ती वास्तू कधीच आनंदी नसते. त्यात जर दोन भाऊ, त्यांच्या बायका आणि मुलं असा दहा बारा जणांचा गोतावळा असेल आणि लहान मुलांची भांडणं असतील तर आधीच्या गोड नात्यात कडवटपणा येण्याची शक्यता असते. दोन जावांचं मुलांवरून जाम बिनसतं, आणि कलुषित मनाने कुटुंबं वेगळी होतात. अशी वेळ यायला नको असेल तर आधीच विचार करून थोडंसं अंतर ठेवून, वेगवेगळे राहिल्यास उलट एकमेकांबद्दल आपुलकी आणि ओढ वाढते हा अनेकांचा अनुभव आहे.

हेही वाचा- मूत्रविसर्जनाबाबत खास स्त्रियांसाठीच्या सहा चांगल्या सवयी..

सुमीता आणि तिच्या सासूबाई यांच्यात सतत होणाऱ्या कुरबुरीमुळे सुमीताचे सासरे आणि तिचा नवरा विवेक खूप वैतागलेले होते. घरात कायम तणावपूर्ण वातावरण असे. अनेकांनी त्यांना वेगळं होण्याचा सल्ला दिला, पण तसं करायला त्यांची हिम्मत होत नव्हती. मग विवेकने दुसऱ्या शहरात नोकरी पत्करली, आणि दोघं तिकडे शिफ्ट झाले. रोजच्या कटकटीतून विनासायास सुटका झाली. थोडा विराम मिळाल्याने सगळ्यांनाच एकमेकांची किंमत कळली आणि ते खरं दूर राहून खऱ्या अर्थाने नांदू लागलं.

नेत्राच्या भांडखोर स्वभावाचा तिच्या गरीब स्वभावाच्या सासूला प्रचंड त्रास होत होता, पण मुलाला वाईट वाटेल म्हणून त्या सगळं सहन करत होत्या. शेवटी असह्य होऊन एक दिवस त्यांनी मुलाला विश्वासात घेऊन शेजारच्या इमारतीत स्वतःसाठी एक छोटीशी सदनिका घेतली, आणि एक काळजीवाहू दायीही नेमून टाकली. त्यामुळे प्रत्येकाला शांतता लाभली. नातू हवं तेव्हा आजीकडे जाई, शिवाय दर दिवसाआड मुलगाही आईला हवं नको ते बघून येऊ शकत होता. एकत्र राहून होणारा प्रत्येकाचा कोंडमारा थांबला होता. आश्चर्य म्हणजे नेत्राही सासुशी चांगलं वागू लागली.

हेही वाचा- लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जोडिदाराच्या भावनांचीही कदर व्हावी

सुपर्णाची मात्र वेगळीच कहाणी. तिच्या लग्नानंतर दोनच वर्षांनी तिचे सासू सासरे तिच्याकडे राहायला आले आणि सलग २५ वर्ष राहिले. त्यांचे संबंध वाईट नसले तरी इतक्या वर्षांत तिच्या बाजूने अनंत तडजोडी करून ती आतून वैतागली होती. मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली, सुपर्णा स्वतः नोकरीतून निवृत्त झाली, आणि तिचं जगच बदललं. तिला मोकळा वेळ मिळू लागला, आणि आपण इतकी वर्ष अनेक गोष्टींचा त्याग करत आलो आहोत प्रकर्षाने हे तिच्या लक्षात यायला लागलं. मैत्रिणींना मोकळेपणा वाटत नाही म्हणून कधीच भिशी घरी केली नाही. कायम सासू सासरे घरात म्हणून तिचे आईवडील क्वचितच तिच्याकडे आले. सकाळी घरी येणारं वर्तमानपत्र कधीच तिला आधी वाचायला मिळालं नाही. ज्येष्ठ मंडळींमध्ये सुपर्णा आणि तिच्या नवऱ्याला कधीच घरात मोकळेपणा मिळाला नाही. स्वयंपाकघरावर कायम सासूचा ताबा. घरातील कामवाल्यांवर त्यांचाच रुबाब. आपला संसार आपण मनासारखा केलाच नाही या भावनेने ती आताशा अत्यंत नाराज राहू लागली. निवृत्ती नंतर आता जरा कुठे मोकळेपणा मिळणार तर सासुसासऱ्यांच्या तब्येतीच्या इतक्या तक्रारी सुरू झाल्या, की ती त्यांच्या आजारपणात पार बुडून गेली. आपण आधीच वेगळं राहिलो असतो तर निदान तरुण वयात थोडा मोकळेपणा मिळाला असता, असं सुपर्णा आणि तिच्या पतीला अतिशय प्रकर्षाने वाटू लागलं, पण आता वेळ निघून गेली होती. आता पुढील काही वर्षं सासू सासऱ्यांसाठी द्यायची होती …वेळ हातून निसटून गेली होती.

घरात सगळे एकत्र राहत असताना सतत कुरबुरी होत असतील, सतत तडजोडी कराव्या लागत असतील, वातावरणात तणाव राहात असेल, आनंदच नसेल मिळत जगण्याचा तर वेळीच निर्णय घेऊन एकमेकांना ‘स्पेस’ देणं खरंच गरजेचं आहे. नातं सुदृढ राहण्याची ती एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे म्हणा हवं तर !

adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader