Premium

पाकिस्तानच्या ९० हजार सैन्याला नमवणाऱ्या सॅम माणेकशा यांच्या तीन पाठिराख्या; जाणून घ्या कामगिरी

कोण आहेत सॅम माणेकशॉ? भारत-पाकिस्तान युद्धात बजावली होती महत्त्वाची भूमिका

Meet Sam Bahadur's Real Family: Three Women Who Defined His Life sam bahadur real family wife children
सॅम बहादुर कुटुंब (फोटो: The Week)

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित हा चित्रपट लष्करी अधिकारी सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात मार्शल सॅम माणेकशाॅ यांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटामध्ये १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातली सॅम माणेकशॉ यांची कामगिरी, त्यांचं जीवन आणि कारकिर्दीवर प्रकाश टाकला गेलाय. ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, ते सॅम माणेकशॉ, ‘सॅम बहादुर’ कोण होते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. तसेच, या कारकिर्दीत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तीन स्त्रिया कोण होत्या, हेसुद्धा जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९० हजार पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकायला लावणारे कोण होते सॅम माणेकशॉ?

सॅम माणेकशॉ यांना ‘सॅम बहादूर’ नावानंही ओळखलं जातं. ते १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कराचे प्रमुख होते. तसंच फिल्ड मार्शल पदावर बढती दिली गेलेले ते पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध अनेक दिवस चालले. अनेक सैनिक जखमी झाले, अनेक शहीद झाले. पण, भारतीय सैन्याने निर्धाराने युद्ध सुरूच ठेवले. अखेर १३ दिवसांनंतर पाकिस्तानी लष्कराच्या ९० हजारांहून अधिक सैनिकांनी शस्त्रे टाकली. इतक्या मोठ्या संख्येने सैनिकांनी आत्मसमर्पण करण्याची ही इतिहासात पहिलीच वेळ होती.

सॅम बहादुर यांच्या कुटंबातील तीन स्त्रियांचा प्रभाव त्यांच्या एकूण आयुष्यावर कसा होता. सॅम माणेकशॉ यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन कसे होते, यावर एक झलक टाकूयात.

सॅम बहादुर यांच्या आयुष्यातली ती पहिली स्त्री

सॅम माणेकशॉ यांनी २२ एप्रिल १९३९ रोजी मुंबईत सिल्लू बोडेसोबत लग्न केले. सान्या मल्होत्राने चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची जोडीदार सिल्लू बोडे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. सॅम माणेकशॉ आणि सिल्लू बोडे यांना शेरी आणि माया अशा दोन मुली आहेत.

माणेकशॉ यांच्या जीवनातील सिल्लूची भूमिका आणि प्रभाव

सॅम बहादुर यांची छोटी मुलगी माया हिनं एका मुलाखतीदरम्यान सॅम बहादुर आणि सिल्लू बोडे यांच्याबद्दल सांगितलं आहे. सॅम बहादुर आणि सिल्लू बोडे यांची भेट एका पार्टीमध्ये झाली. तिथेच त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नही केलं. सिल्लू बोडे या सॅम बहादुर यांच्या पाठी नेहमी उभ्या असायच्या. त्यांना प्रत्येक निर्णयामध्ये पाठिंबा द्यायच्या. तसेच वेळोवेळी त्यांना सावधही करायच्या. सोबतच नेहमी जमिनीवर पाय ठेवले पाहिजेत यांची जाणीव करून द्यायच्या.

हेही वाचा >> ‘त्या’ एका क्षणानं बदललं आयुष्य, डॉक्टर अक्षिता गुप्ता ते IAS अधिकारीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मान

माणेकशॉ हे अत्यंत प्रतिष्ठित लष्करी अधिकारी होते. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि मिलिटरी क्रॉसने सन्मानित करण्यात आलं होतं. फिल्ड मार्शल दर्जा मिळविणारे ते पहिले भारतीय सैन्याधिकारी होते. भारतातली धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचे ते पुरस्कर्ते होते. यादरम्यान त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या दोन मुली आणि पत्नीचंंही यामध्ये योगदान आहे. माया सांगतात की, वडील सॅम माणेकशॉ यांनी कधीही आमच्यावर त्यांची लष्करी शिस्त लादली नाही.भारतीय लष्करात महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या माणेकशॉ यांचा मृत्यू २७ जून २००८ रोजी झाला. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयातलं त्यांचं योगदान नेहमीच भारतीयांच्या स्मरणात राहीलभशह.आता सॅम बहादूर चित्रपटाच्या निमित्ताने सॅम माणेकशॉ यांची कामगिरी पुन्हा एकदा देशभर पोहोचेल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meet sam bahadurs real family three women who defined his life sam bahadur real family wife children srk

First published on: 03-12-2023 at 13:49 IST
Next Story
नीना गुप्तांनी फालतू म्हटलेल्या फेमिनिझमचा खरा अर्थ काय? स्त्रीवादी भूमिका स्वीकारणं पुरुषद्वेषी का ठरतंय?