जगातील सर्वश्रेष्ठ सौंदर्यवतीची निवड करणारी स्पर्धा म्हणजे ‘मिस युनिव्हर्स’! सगळ्या जगातल्या फॅशनप्रेमी विश्वाचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलं असतं. ही स्पर्धा म्हणजे फक्त सौंदर्याची स्पर्धा नसते, तर ती संपूर्ण व्यक्तिमत्वाची स्पर्धा असते. अशा या स्पर्धेत जिंकण्यासाठी स्वत:चा ठसा उमटवणंही खूप महत्त्वाचं ठरतं. या वर्षी नुकत्याच १९ नोव्हेंबर रोजी अल साल्वादोरमध्ये झालेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमात निकारागुआ देशाच्या सौंदर्यवतीनं बाजी मारली. निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिनं ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट जिंकला. हा किताब जिंकणारी ती निकारागुआची पहिलीच युवती ठरली. परंतु या वर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत यासारख्याच अनेक नव्या गोष्टी घडल्या आहेत. कितीतरी जुन्या परंपरांना छेद देत झालेली ही स्पर्धा म्हणजे सौंदर्याच्या नव्या, बदलत्या संकल्पनेचे भविष्यातील प्रतिबिंब म्हणता येईल.

सहसा मॉडेल्स आणि त्याही सौंदर्यस्पर्धेतील मॉडेल्स म्हणजे चवळीच्या शेंगेसारख्या बारीक, नाजूक असं समजलं जातं. त्यातही मिस युनिव्हर्ससारखी स्पर्धा म्हणजे तर सर्व शारीरिक परिमाणांची अगदी काटेकोर पूर्तता करणाऱ्याच तिथपर्यंत पोहोचल्या असणार हे उघड आहे. असं असूनही यंदाच्या स्पर्धेत एक नवल घडलं. अनेक स्टिरिओटाईप्स तोडत या स्पर्धेत पहिल्यांदाच ‘प्लस साईज’ मॉडेल सहभागी झाली. नेपाळचं प्रतिनिधित्व करणारी जेन दीपिका गॅरेड ही मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेली जगातली पहिली प्लस साईज मॉडेल ठरली. अमेरिकेत जन्मलेली जेन २२ वर्षांची आहे. तिचं वजन ८० किलो आहे. अर्थातच सौंदर्यस्पर्धांमध्ये असलेल्या नेहमीच्या सडपातळ मॉडेल्सच्या तुलनेत हे वजन जास्त आहे. जेन मिस नेपाळ स्पर्धेची विजेती आहे. तो किताब जिंकल्यानंतर तिनं तिचा स्पर्धेत सहभागी होण्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन मांडला होता. ‘सौंदर्याच्या एरवीच्या मापदंडांची पूर्तता न करणाऱ्यांसाठी मी इथे उभी आहे,’ असं ती म्हणाली होती. ‘शरीराची वळणंही महत्त्वाची असतात आणि अनेकींसाठी ही वळणं सौंदर्याचा मापदंड असू शकतो,’ असं जेन म्हणाली. जाड, जास्त वजन असणाऱ्या किंवा हॉर्मोन्स असंतुलनामुळे शरीर स्थूल असणाऱ्या, पण या स्पर्धेसाठी पात्र असणाऱ्या अनेकींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण इथे आल्याचं तिनं सांगितलं.

sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत

या वर्षीच्या मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडर स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. नेदरलँडचं प्रतिनिधित्व करणारी रिक्की व्हेलेरी कोले आणि मिस पोर्तुगाल मरीना मशेटे या दोघी ट्रान्सजेंडर आहेत. ट्रान्सजेंडरचा हा सहभाग अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला, तरी पठडीतल्या सौंदर्याच्या संकल्पना बदलत आहेत याची ही नांदी म्हणावी लागेल.

हेही वाचा… विवाहानंतर माहेरचे घर सोडले असे गृहीत धरता येणार नाही, मद्रास उच्च न्यायालायाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

एकदा का मुलीचं लग्न झालं की मग अशा सौंदर्यस्पर्धांमध्ये तिला सहभागी होता येत नाही. त्यातही आई झाल्यावर तर मॉडेलिंगमधलं करिअर जवळपास संपुष्टातच येतं असं समजलं जातं. पण या वर्षीच्या मिस युनिव्हर्समध्ये या समजालाही छेद देण्यात आला. या वर्षीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या मिस ग्वाटेमाला मिशेल कोहन आणि मिस कोलंबिया कॅमेला एवेला या दोघीही मॉडेल असण्याबरोबरच आईही आहेत. २८ वर्षांची मिशेल ही दोन मुलांची आई असण्याबरोबरच एक मॉडेल आणि उद्योजक आहे. तर मिस कोलंबिया कॅमेला ही एका मुलीची आई आहे. या स्पर्धेत टॉप ५ मध्ये पोहोचणारीही ती पहिली विवाहीत स्त्री आणि आई आहे. आता या स्पर्धेतील स्पर्धकांसाठीचा अविवाहित असण्याचा नियम बदलण्यात आला आहे. यापुढे विवाहित महिलाही मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. मातृत्व हा स्त्रियांसाठी करिअरचा फुलस्टॉप नाही, हा महत्त्वाचा संदेश यातून दिला गेला.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच पाकिस्तानातील स्पर्धकही सहभागी झाली होती. २४ वर्षांची एरिका रॉबिन्स हिनं पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या सौंदर्य आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर एरिकानं पहिल्या २० स्पर्धकांमध्ये स्थान पटकावलं. पण त्यासाठी तिला तिच्या देशात बरंच सहन करावं लागलं होतं. मालदीवमध्ये झालेली मिस पाकिस्तान ही स्पर्धा सरकारच्या परवानगीशिवाय झाल्याचा दावा करण्यात आला होता आणि या स्पर्धेची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले होते. स्विमसूट राऊंडमध्ये एरिकानं कफ्तान गालून रँम्प वॉक केला होता, याचीही भरपूर चर्चा झाली होती. जागतिक स्तरावर पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया एरिकानं दिली होती.

एकूणच यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा अनेक नव्या गोष्टींची सुरुवात करणारी ठरली. श्वेता शारदा हिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं पण तिल्या पहिल्या १० मध्ये स्थान पटकावता आलं नाही. ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन दुसरी रनर अप, तर थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड थर्ड रनर अप ठरली. एकूण ८४ देशांच्या सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

या स्पर्धेच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल तुमचं काय मत आहे? स्पर्धेचे निकष अशा पद्धतीनं बदलणं अधिक सर्वसमावेशक आणि मानसिकता बदलण्याच्या बाबतीत नवीन पायंडे पाडणारं ठरेल का? आम्हाला जरूर कळवा.

lokwomen.online@gmail.com