“म्याडम, अगदी देवासारख्या आल्या हो तुम्ही आज माझ्या घरी! माझ्या आईबाबांना समजवा. माझी शाळा बंद झालीच, पण आता बोहल्यावर चढवण्याची घाई झाली त्यासनी.. माझं स्वप्न स्वप्नच राहून गेलं बघा… आता हायच आयुष्यभर नशिबात लोकाच्या घरची धुणीभांडी पण निदान लग्न तरी टाळा माझं…” १६ वर्षाची निशी आपली आपबिती आपल्या लाडक्या शिक्षीका कुंदा बच्छाव यांच्यासमोर मांडत होती.

दिवसाआड निशा, मालती, हेमा अशा सगळ्या माजी विद्यार्थींनी हेच गाऱ्हाणं घेऊन कुंदा मॅडमकडे येत होत्या. त्यातील काहींची लग्नही झाली. दोष कोणाला द्यायचा? घरात अठराविश्व दारिद्रय. नाईलाजास्तव पालकांनी घेतलेला हा निर्णय. पण यामुळे मुली बालविवाहाच्या बळी ठरत होत्या.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

ही परिस्थिती कुंदा यांना अस्वस्थ करून गेली. शिक्षिका म्हणून नाही, तर माणुसकी या नात्याने ही परिस्थिती बदलायची असा चंग त्यांनी बांधला. पण त्याच वेळी ‘करोना’ने दारावर धडक दिली. महापालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर खूप शिकून लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे यातल्या अनेक मुलींचे स्वप्न पूर्ण होणं मान्य नव्हतं की काय, अशी भिती मुलींसह कुंदाताई यांच्या मनात होती. कुंदाताईंना रोज गावोगाव चालणाऱ्या सर्वेक्षणात अशाच काहीशा कहाण्या कळत होत्या. आपल्यावर प्रचंड विश्वास टाकणाऱ्या आपल्या देशात विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेताना इतके लढावे लागत आहे, हे बघून कुंदा यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची व त्यांच्या पालकांच्या समुपदेशनाची तयारी सुरू केली.

२१ मे २०२१ रोजी शिकण्याची इच्छा व जिद्द असलेल्या गीतांजली, संध्या आणि आरती यांच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलत त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. आणि यातून सुरू झाले ‘शैक्षणिक पालकत्व- एक हात मदतीचा’ हे अभियान. यामुळे या तीन्ही मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्या. त्यांच्यासारख्या इतर मुलींचे काय, कुंदा यांनी आपली मैत्रीण वैशाली यांना या मुलींची समस्या सांगितली. त्या या उपक्रमात जोडल्या गेल्या. बंधु प्रशांत पाटील यांनीही मदतीचा हात पुढे केला. पाच हुशार व व गरजू मुलींच्या शिक्षणाचा मार्ग तर सुकर झाला होता. पुढील मदतीसाठी समाजमाध्यमांचा वापर करत समाजातील दानशूर व्यक्तींना गरजू व होतकरू मुलींना त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे विनंतीवजा आवाहन करण्यात आले. या आवाहनाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा… साक्षी ‘तो’ गड्यांचाच खेळ गं! स्टेशन ते ऑफिस अगदी घरीही आम्ही हाच लढा देतो, आपलं चुकतं इतकंच..

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह प्रभागातील नगरसेवक, रोटरी क्लब, innerwheel क्लब यांसारख्या संस्थांबरोबर समाजातील खूप दानशूर व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. या दानशूर व्यक्तींच्या पुढाकार व मदतीमुळे १०० हून अधिक मुलींना शैक्षणिक पालकत्व मिळाले.

या शैक्षणिक पालकत्व अभियानामुळे या १०० मुली बालविवाह समस्येपासून मुक्त झाल्या व शिकून कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी पायलट, तर कोणी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागल्या.

आनंदाची गोष्ट म्हणजे आठवीत शाळा सोडलेली गीतांजली पाच वर्षानंतर पुन्हा शिक्षण प्रवाहात आली, १७ नंबरचा अर्ज भरून तिने इयत्ता दहावी वीची परीक्षा दिली व ६४ गुणांनी उत्तीर्णही झाली. आरती ८३ टक्के गुण मिळवून शाळेत दुसरी आली. संध्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

अर्थातच मुलींनाही समाजातून मिळणाऱ्या या मदतीची जाणीव आहे व म्हणून त्या खूप मेहनत घेऊन अभ्यास करत आहेत. अशा असंख्य मुलींची स्वप्न पुर्ण होण्यासाठी गरज आहे ती समाजातील आणखी दानशूर हातांची!

lokwomen.online@gmail.com