scorecardresearch

Premium

नवरा सतत कमी लेखतो, शाब्दिक छळ करतो? Emotional Abuse म्हणजे काय? ते कसं रोखाल?

रोजच्या आयुष्यात अनेकदा आपण भावनिक छळाचा सामना करतो पण आपल्याला तो ओळखता येत नाही.

Emotional Abuse
भावनिक छळ म्हणजे काय?

आपण लैंगिक छळ हा शब्द अनेकदा ऐकलाही असेल. रोज आपण लैगिक छळाच्या घटना वाचत असतो. पण लैंगिक छळाव्यतरिक्त आणखी एक छळ आहे तुम्हाला माहिती आहे का. तो म्हणजे भावनिक किंवा मानसिक छळ. ‘तुला अक्कल नाही’, ‘तू वेडी आहेस’ यांसारखी वाक्ये कुटुंबात सर्रास ऐकायला मिळतात. अनेकदा भांडणामध्ये नवऱ्याने बायकोला किंवा सासूने सूनेला टोमणे मारलेल्याच्या घटना आपण अनेकदा बघितल्या असतील. दिवसभरात अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींकडूनही आपल्यासाठी अशा प्रकारची वाक्ये बोलली जातात. ही वाक्ये ऐकायला जरी साधी असली तरी अनेकदा ते मनावर परिणाम करुन जातात. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच सुरुवात होते भावनिक छळाची.

हेही वाचा- पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी केली क्रॅक अन् बनली IPS अधिकारी; काम्या मिश्राची ‘ही’ रणनीती वापरुन तुम्हीही करा आभ्यास

Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Chanakya Niti
Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्यांचे ‘हे’ शब्द तुमच्याकडे नोट करुन ठेवा; नेहमी राहाल पुढे
It is dangerous to rush into any decision
समुपदेशन : निर्णयाची घाई करताय?

नवरा बायकोच्या भांडणात अनेकदा नवरा बायकोला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. तसेच अनेकदा सासू सुनेला म्हणतं असते. तुझ्याअगोदर माझ्या मुलाने एकापेक्षा एक भारी स्थळ बघितली पण तुझ्यात काय बघितलं आणि तुला पसंत केलं देव जाणे? अशी वाक्ये बोलून समोरच्याला दुखावणे म्हणजेही एक प्रकारचा भावनिक छळच आहे.

भावनिक छळ म्हणजे काय?

भावनिक छळ सहजासहजी ओळखता येत नाही. अशा प्रकारच्या छळात समोरचा व्यक्ती तुमचे भावनिक शोषण करतो. सुरुवातीला तुमच्या हे लक्षात येत नाही. उदा. तुमचा जोडीदार प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दोष देऊ लागतो. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही त्यांचा पारा चढतो. दोघांच्या नात्यात नवरा स्वत:ला उच्च स्थानी मानत असतो. आणि बायकोला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करते. मात्र, जसजसे आपल्या हे लक्षात येऊ लागतं तसतसे त्या नात्यात आपला जीव गुदमरु लागतो. पण अनेकदा नाईलाजास्तव इच्छा असूनही आपण त्या नात्यातून बाहेर पडू शकत नाही.

भावनिक छळाचे परिणाम काय?

जरी भावनिक छळामुळे कोणतेही शारिरीक नुकसान होत नसले तरी अशा प्रकारच्या छळामुळे मनावर मोठा परिणाम होतो. अशा प्रकारच्या छळामुळे पीडित महिलेची भावनिक अवस्था बिघडू शकते. एवढचं नाही तर तिच्या मनावर मोठा आघातही होऊ शकतो. अनेकदा पीडित महिला स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखू लागते. एक प्रकारचा न्यूनगंड त्या महिलेमध्ये निर्माण होतो. अशा छळामध्ये महिला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसतात. तसेच अजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी ती महिला स्वत:ला जबाबदार धरू लागते. नवऱ्याबरोबर किंवा इतर कुणाबरोबर झालेल्या भांडणामध्येही महिला सगळा दोष स्वत:ला देतात.

हेही वाचा- प्रत्येक सहा मिनिटाला बलात्काराची घटना; जगभरात स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात निषेध-आंदोलनं

तसेच भावनिक छळ होत असलेल्या महिलांच्या मनात स्वतःबद्दल सतत नैराश्याची भावना निर्माण होते. त्यांना कोणत्याच कामातून आनंद मिळत नाही. आपण काही चांगलं करु शकतं नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. प्रत्येक गोष्टीसाठी अनेकदा त्या स्वत:लाच दोष देतात. आपण एकाद्या व्यक्तीच्या अधीन होऊन गेलो आहोत असंही त्यांना वाटू लागतं.

भावनिक छळाला विरोध कसा करायचा?

भावनिक छळाचा स्वत: किती आणि केवढा परिणाम करुन घ्यायचा हे त्या त्या व्य्क्तीवर अवलंबून असते. आपला भावनिक छळ करणाऱ्या व्यक्तीला वेळीच आपण रोखले नाही तर त्याचा आपल्यावरच वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समोरचा व्यक्ती जर तुमचा भावनिक छळ करत असेल तर त्याला स्पष्टपणे विरोध करा. भावनिक छळ करणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी अंतर ठेऊन वागा. अशा व्यक्तींचे फोन, मेसेज यांना रिप्लाय देणे म्हणजे स्वत:हून त्रास ओढवून घेणे. आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:वर लक्ष केंद्रित करा.

हेही वाचा- आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींचीही, पण समाजाची मानसिकता संकुचित का?

अशा भावनिक छळातून बाहेर पडण्यास आजूबाजूच्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. छळामुळे खालावलेली भावनिक परिस्थिती सुधारण्यासाठी मनोवैज्ञानिकाचा सल्लाही घेऊ शकता. तुम्हाला सकारात्मक वाटतील अशाच व्यक्तींबरोबर वेळ घालवा. आणि परिस्थीती जास्त हाताबाहेर जात असेल तर तुमच्यावर होणारा भावनिक छळ थांववण्यासाठी तुम्ही पोलिसांचीही मदत घेऊ शकता

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is emotional abuse how to prevent this dpj

First published on: 27-11-2023 at 19:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×