Body Shaming : बाईनं कसं दिसावं, कसं असावं याच्या चौकटी समाजाने बांधून ठेवल्या आहेत. समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्याच्या व्याख्येत एखादी स्त्री बसली नाही की ती कुरूप ठरते. त्यातही पब्लिक फिगर असणाऱ्या महिलांना तर या चौकटी समाजाने अलिखित बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे या चौकटीबाहेर राहणाऱ्या, सौंदर्याच्या व्याख्येत न बसणाऱ्या महिलांवर टीका केली जाते. असाच प्रकार एका टीव्ही अँकरबरोबर घडला. परंतु, तिनं दिलेलं उत्तर प्रत्येकाला अंतर्मुख करणारं ठरलं आहे.

गोरी कांती, उंच अन् पातळ बांधा, टपोरे डोळे, रेखीव चेहरा असणाऱ्या मुलींना/महिलांना सुंदर म्हटलं जातं. परंतु, या व्याख्येत न बसणाऱ्या महिला सरसकट कुरूप किंवा सौंदर्यहीन ठरतात. मग अशावेळी त्यांना विविध स्तरातून टीकेला सामोरे जावं लागतं. पूर्वीच्या काळी अशा महिलांवर थेट टीप्पणी केली जायची. यामध्ये महिलाच महिलांना कमी लेखत असत. महिलाच महिलांवर हसत असत. परंतु, काळ पुढे सरकला, तसं टीका करण्याचं माध्यम बदलत गेलं. आता सोशल मीडियावरील फोटोंवरून ट्रोल केलं जातं. एका कॅनेडिअन अँकरला तर चक्क ईमेलद्वारे बॉडी शेमिंगंसदर्भात टीका सहन करावी लागली. पण अशा टीकांना खतपाणी घालेल ती अँकर कसली. तिनेही ऑन एअर या ईमेलकर्त्याला सुनावलं. पण तिचं ते उत्तर ऐकून कदाचित ईमेल पाठवणाऱ्यालाही आपल्या कृत्याची लाज वाटली असेल हे निश्चित.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >> Crime Against Women : “गुन्हे वाढले नाहीत, महिला पुढाकार घेऊन FIR दाखल करत आहेत”

लेस्ली हॉर्टनला ही टीव्ही न्युज अँकर आहे. तिला सुश्री हॉर्टन यांनी एक ईमेल पाठवला. त्यात म्हटलं होतं की, “तुमच्या गरोदरपणाबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही असेच जुन्या बस ड्रायव्हरच्या पॅन्ट घालत राहिलात तर तुम्हाला अशाच ईमेलची अपेक्षा करावी लागेल.” अशा पद्धतीचा ईमेल आल्यावर एखाद्या महिलेचं मानसिक खच्चीकरण होईल. तिला आपलं काम सोडून द्यावंसं वाटेल. पण लेस्लीने अत्यंत खिलाडूवृत्तीने या ईमेलला प्रत्युत्तर दिलं. ती ग्लोबल न्यूज मॉर्निंग कॅल्गरीवर चॅनेलवर बातम्या प्रसारित करण्याचं काम करते. तिने नेहमीप्रमाणे आपलं काम सुरू केलं. बातम्या देत असतानाच तिने या ईमेलबाबत बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली की, मला आज एक ईमेल आला. त्यात मी गरोदर दिसत असल्याचं म्हटलंय. तसंच, मी बस ड्रायव्हरप्रमाणे पॅन्ट घालून सोडून दिलं नाही तर तुम्हाला अशा ईमेलची अपेक्षा करावी लागेल. पण या मेलसाठी धन्यवाद.

हेही वाचा >> प्रिय केतकी, पत्रास कारण की.. तुझ्या धाडसाचं खूप खूप कौतुक!

ती पुढे म्हणाली, मी गरोदर नाही. कर्करोगामुळे गेल्यावर्षी माझे गर्भाशय काढण्यात आले. त्यामुळे माझ्या वयाच्या स्त्रीया अशाच दिसतात. हे जर तुमच्यासाठी आक्षेपार्ह असेल तर ते दुर्दैवं आहे. तुम्ही पाठवलेल्या ईमेलबद्दल विचार करा, असाही सल्ला तिने पुढे दिला.

तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्सने तिचं अपार कौतुक केलं आहे. अत्यंत शांततेत, संयमाने तिने हे प्रकरण हाताळलं, त्यामुळे ती खरंच कौतुकास पात्र आहे. “तुम्ही कर्करोग योद्धा आहात आणि सर्वत्र महिलांसाठी चॅम्पियन आहात! तुम्ही जे करत आहात ते करत रहा!”, असं कॅनेडियन कॅन्सर सोसायटीने म्हटलं आहे.

लेस्लीने दिलेलं उत्तर चोख आहे. प्रत्येकाने अशाचप्रकारे धीराने आपल्यावर होणाऱ्या बॉडी शेमिंगविरोधात आवाज उठवला तर लवकरच बदल घडेल. अन्यथा या गोष्टी फोफावण्यास वेळ लागणार नाही. परंतु, हे करण्याआधी आपण बॉडी शेमिंगला बळी पडतो आहोत, याची जाणीव व्हायला हवी. कारण सामाजिक दडपणामुळे अनेकजणींमध्ये न्युनगंड आलेला असतो. आपणच वाईट आहोत, आपणच कुरुप दिसतो, असं अनेक मुलींना वाटतं. मग हे वाईट दिसणं शरीर-बांध्याबाबत असो वा चेहऱ्याबाबत असो. निसर्गाने दिलेल्या या ठेवीला आपण कृत्रिमरित्या बदलू शकत नाही. कृत्रिमरित्या बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे अनेक साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे आपण आहोत तसं स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे. जग आपल्याविरोधात काय बोलतंय, किती बोलतंय, कसं बोलतंय याकडे दुर्लक्ष करून त्यांना त्यांच्या कृतीवर आणि टीकेवर चोख प्रत्युत्तर देता यायला हवं.

Story img Loader