sattaसट्टेबाजांनी सुरुवातीपासूनच भारतालाच पसंती दिली होती. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर भारतीय सट्टेबाजांना मोठा फटका बसला असता. परंतु तसे काही न झाल्याने सट्टेबाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या विजयामुळे भारताचा भाव बऱ्यापकी वधारला आहे. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात भारताला आता पहिल्या पाचांत स्थान मिळाले आहे. सुरुवातीला भारतीय सट्टेबाजही भारताबाबत फारसे आग्रही नव्हते. आताही भारत विश्वचषक जिंकेल असे सट्टेबाज ठामपणे म्हणण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय व भारतीय सट्टेबाजारात अद्यापही ऑस्ट्रेलियाच सरस आहे. द. आफ्रिका, न्यूझीलंडपाठोपाठ आता भारताचा क्रमांक चौथा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सुरुवातीचा भाव ६० पसे होता, तो नंतर ३० पशांपर्यंत पोहोचला होता. मात्र या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबाबत भारताच्या भावात फारसा फरक पडलेला नाही. आताचा भाव भारतासाठी दीड रुपया आहे, तर दक्षिण आफ्रिकेसाठी ४५ पसे. म्हणजे पाकविरुद्धच्या सामन्यात भारताने मोठय़ा फरकाने विजय मिळविला असला तरी सट्टेबाजारात भारताला चांगला भाव द्यायला अद्याप तरी सट्टेबाज तयार नाहीत, हे दिसून येत आहे.
ता. क. : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आर्यलडने दिलेला धक्का सट्टेबाजांसाठी इशारा ठरला आहे. आर्यलडसाठी भाव देण्याची त्यांची तयारी नव्हती. आता मात्र त्यांना सट्टाबाजारात महत्त्व प्राप्त होणार आहे.
निषाद अंधेरीवाला

सोशल कट्टा
ब्रेक्रिंग न्यूज!.. शिखर धवन आणि शाहिद आफ्रीदी यांच्या मातोश्री विराट कोहलीशी भांडायला येणार! एकाचे शतक हुकवल्याबद्दल आणि दुसऱ्याला शेवटच्या विश्वचषकातही भारताविरुद्ध जिंकण्याचा आनंद मिळू न दिल्याबद्दल!