सर मी २७ वर्षे वयाचा तरुण असून मागील २ वर्षांपासून मुंबईत सरकारी नोकरी करीत आहे. तसेच नुकतेच लग्नही झालेले आहे. मी पुढील वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गाडी घेऊ इच्छितो. माझा गाडी घेण्याचा उद्देश मुळात फक्त गावी येण्याजाण्यासाठीच आहे. माझे वर्षांकाठी १० ते १२ वेळा गावी जाणे होते. मुंबईत तशी मला गाडीची फारशी गरज पडत नाही. तरी यास्तव मुळात मला काही प्रश्न भेडसावत आहेत. मी गाडी घेऊ का? असल्यास कोणती व का? नसल्यास का व कधी घेऊ? – मंगेश दराडे

तुम्ही तुमचे गाव नेमके किती दूर आहे याचा उल्लेख केलेला नाही. तुमचे गाव मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असले तर तुम्हा दोघांना एवढा मोठा प्रवास त्रासदायक ठरेल. गाडी घ्यायला हरकत नाही, मात्र घेतलीच तर पेट्रोलवर चालणारी घ्या, म्हणजे सात-आठ दिवस नाही वापरली तर काही हरकत नाही. मुंबईत पाìकगची सोय असेल तर स्विफ्ट ही लांब पल्ल्यासाठी उत्तम कार आहे.

मी इंजिनीअिरगच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला गाडय़ांची खूप आवड आहे. गाडीची रचना कशी करतात, कोणकोणते तंत्रज्ञान त्यासाठी वापरले जाते याची माहिती हवी आहे. माझा प्रश्न सदराशी संबंधित नाही, परंतु तरीही उत्सुकता म्हणून विचारतो आहे. – मयूर गोकर्ण, पुणे</strong>
गाडय़ांची प्रत्यक्ष निर्मिती करण्याआधी त्यांचे थ्रीडी सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रारूप बनवले जाते. म्हणजे सेडान, एसयूव्ही, एमयूव्ही, हॅचबॅक इत्यादी. नंतर त्यांचे पार्ट्स तयार केले जातात. इन्स्पेक्शन होऊन त्यांची चाचणी घेतली जाते. नंतर त्यांचे कोटिंग होते, असेम्ब्ली केले जाते आणि फायनल टच (अपहोल्स्ट्री) बसवली जाते. वेिल्डग, फोìजग, प्रेसिंग, डाइज, मोल्ड्स वापरले जातात. गाडय़ांसाठी बहुतेक सगळीच तंत्रे लागतात आणि मटेरियलही रबरपासून अगदी लाकूड, फायबर, प्लास्टिक, धातू, फ्लुइड्स इत्यादींपासून बनवले जाते. त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्री असेल तर संपूर्ण जगाला त्याच्याशी संबंधित काम असतेच. ऑटोमोबाइल मार्केट तेजीत असेल तर पूर्ण इंडस्ट्रीची आíथक स्थिती जोमात असते.

आम्हाला तुलनेने छोटय़ा आकाराची सेडान कार घ्यायची आहे. होंडा अमेझ, ुंदाई एक्सेंट, टाटा झेस्ट, स्विफ्ट डिझायर, फोर्ड क्लासिक आणि शेवरोले सेल या गाडय़ांपकी कोणती योग्य ठरेल. आम्हाला सिआझ किंवा होंडा सिटीसारख्या चार मीटर लांबीच्या वगरे गाडय़ा नको आहेत. कृपया सुचवा. – सायली कुलकर्णी, पुणे
तुम्हाला पेट्रोल व्हेरिएंट घ्यायचे असेल तर डिझायर किंवा एक्सेंट सर्वोत्तम ठरेल. त्यांचा मायलेजही चांगला आहे. डिझेल व्हेरिएंटमध्ये फोर्ड क्लासिक किंवा टाटा झेस्ट हे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

माझ्याकडे टाटा इंडिगो ईसीएस गाडी आहे. मी तिच्यात टू डिन म्युझिक सिस्टीम डिस्प्लेसह बसवू शकतो का किंवा इतर काही पर्याय आहे. -डॉ. सचिन राऊत, परभणी</strong>
तुमच्याकडे जर इंडिगोमध्ये एक डिन स्लॉट असेल तर त्याचे कम्पार्टमेंट बदलून तुम्हाला नक्की टू डिन टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम जीपीएससह बसवता येऊ शकेल. पायोनिअर सर्वोत्तम आहे.

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.