राजगड पदभ्रमण मोहीम
‘शिवशौर्य ट्रेकर्स’ तर्फे येत्या १ ते २ नोव्हेंबर दरम्यान राजगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. तीन माच्या, बेलाग बालेकिल्ला असलेला राजगड दुर्गप्रेमींना कायमच खुणावतो. या मोहिमेत इतिहासाचे अभ्यासक सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९३२०७५५५३९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
गीर जंगल अभ्यास सहल
‘निसर्ग सोबती’तर्फे २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान गुजरात मधील गीर राष्ट्रीय उद्यानात अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. हे जंगल आशियातील सिंहांसाठीचे एकमेव वसतिस्थान आहे. सध्या या जंगलात ४०० हून अधिक सिंहांचे वास्तव्य आहे. याशिवाय बिबटय़ा, नीलगाय, चितळ, सांबर असे अन्य प्राणीही पाहण्यास मिळतात. याशिवाय अनेक शिकारी पक्षीही इथे पाहण्यास मिळतात.  इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क
ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.साधावा.
वासोटा, तापोळा सहल
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान जावळीच्या खोऱ्यातील वासोटा वनदुर्ग पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या गडाशिवाय तापोळा, महाबळेश्वर परिसरात भटकंती केली जाणार आहे. कोयनेच्या किनारी तंबूतील मुक्काम, अश्वारोहण, जंगलातील भटकंती ही या मोहिमेची वैशिष्टय़े आहेत. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

अन्नपूर्णा बेस कॅम्प
अन्नपूर्णा शिखर हे जगातील १० उंच शिखरांपैकी एक आहे. त्याची उंची ८०९१ मीटर (२६,७०० फूट) आहे. या शिखराच्या पायथ्यापर्यंत जाणारा ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ हा जगातील प्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहे. अन्नपूर्णा शिखर नेपाळच्या उत्तर भागात येते. अन्नपूर्णा शिखराच्या पूर्वेला मारशिंगडी आणि पश्चिमेला लामजुंग हिमालयाचा भाग येतो. हा ट्रेक विविध डोंगरी गावे, नद्या, झरे, जंगले, डोंगरदऱ्यांमधून जातो. या दरम्यान निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. ८००० मीटरपेक्षा अधिक उंची असणारी अन्नपूर्णा आणि धौलागिरी ही दोन शिखरे दिसतात. या ट्रेकसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी तसेच अधिक माहितीसाठी
संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

बांधवगड सफारी
‘वाईल्ड डेस्टिनेशन’तर्फे १६ ते १९ जानेवारी २०१५ दरम्यान मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबईतील किल्ले
महाराष्ट्रातील साडेतीनशे दुर्गाविषयी आपण साऱ्यांनीच ऐकलेले आहे. मात्र मुंबईत आपल्या उशापायथ्याशी असलेल्या मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला किती माहिती आहे? मुंबईतील हे दुर्गवैभव जाणून घेण्यासाठीच एका मोहिमेचे आयोजन केले आहे. होरायझन संस्थेतर्फे येत्या रविवारी (२ नोव्हेंबर)  मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या प्रमुख किल्ल्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध केली आहे. या सफ रीमध्ये या दुर्गाचे दर्शन, त्यांची माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा अनुप बोकील (७७९८०५००८५) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  
 abhijit.belhekar@expressindia.com