20 September 2017

News Flash

छप्पन इंचाचा कस

मोदी स्वत:च एकप्रकारे या विषयाचे राजकारण करीत आहेत..

लोकसत्ता टीम | Updated: May 1, 2017 3:33 AM

संग्रहित छायाचित्र

तिहेरी तलाकचा प्रश्न मुस्लिमांतील सुधारणावादी विचारवंतांवर सोडून मोदी स्वत:च एकप्रकारे या विषयाचे राजकारण करीत आहेत.. 

काँग्रेसप्रमाणे कट्टरतावादी मुस्लीम नेत्यांचे लांगुलचालन करीत बसायचे की कायदा करून हजारो मुस्लीम महिलांचे आशीर्वाद घेतानाच संविधानावरील आदर दृढ करायचा हा खरा मोदींपुढचा प्रश्न असावयास हवा. जाहीरनाम्यातील घोषणाबाजी आणि प्रत्यक्षातील अंमलबजावणी हाच खाक्या याबाबतही सुरू ठेवला तर तो आपल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल याचेही भान त्यांनी ठेवले पाहिजे..

देशातील मुस्लीम भगिनींच्या अवस्थेबद्दल हिंदुत्ववादी बांधवांच्या मनात निर्माण झालेला कळवळा पाहून कोणाचाही ऊर भरून येईल. मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकसारख्या रानटी कुप्रथांची शिकार व्हावी लागते हे पाहून सनातनी हिंदूंचेही मन द्रवत असेल तर ते कौतुकास्पदच असून, भारतीय धर्मनिरपेक्षतेचा तो मोठाच विजय आहे. ही सनातनी हिंदू मंडळी म्हणजे हिंदू धर्मातील सुधारणावादाची आणि म्हणून तमाम हिंदूंची शत्रू असतात असे मानणारांनाही ही एक चपराकच आहे. आज जर त्यांना परधर्मात सुधारणा व्हावी असे वाटत असेल, तर ते स्वधर्मातील सुधारणांना उद्या कशाला बरे विरोध करतील? तेव्हा त्यांच्या मनातील सुधारकी विचारांना सर्वानीच पाठिंबा देणे हे समाजस्वास्थ्यासाठी उपकारकच ठरेल. कदाचित यातूनच उद्या हे सुधारकी सनातनी हिंदू समाजातील कुप्रथांच्या, रानटी रूढींच्या विरोधात उभे ठाकतील. सतीप्रथेचे उदात्तीकरण, ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ म्हणत त्या ‘देवते’कडून घेतला जाणारा हुंडा, स्त्रियांना दिले जाणारे दुय्यम स्थान, त्यातून निर्माण झालेला स्त्रीभ्रूणहत्येसारखा गंभीर प्रश्न याविरोधातही हे सुधारकी सनातनी लढा पुकारतील अशी एक अपेक्षा यातून निर्माण झाली आहे. परंतु तूर्तास त्या सर्व अपेक्षा बाजूला ठेवल्या पाहिजेत, कारण सध्या त्यांच्यापुढे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे तलाकपीडित मुस्लीम महिलांना न्याय मिळवून द्यायचे. खरे तर तिहेरी तलाक हा एका व्यापक प्रश्नाचा एक छोटासा भाग आहे. तो प्रश्न म्हणजे वैयक्तिक कायदा. याचा आणि समान नागरी कायद्याचा जवळचा संबंध आहे. अनेकांचा असा समज आहे की आपल्याकडे समान नागरी कायदा नाही. वस्तुत: एक वैयक्तिक कायदा वगळल्यास देशात सर्व नागरिकांसाठी समानच कायदा आहे. समस्या आहे ती वैयक्तिक कायद्यांची.

ते म्हणजे धर्मातरित विवाह रद्द करण्याबाबतचा कायदा, ख्रिस्ती विवाह कायदा, काझी कायदा, आनंद विवाह कायदा, पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा, मुस्लीम विवाह निरस्त कायदा, विशेष विवाह कायदा, हिंदू विवाह कायदा, विदेशी विवाह कायदा आदी ‘वैयक्तिक’ कायदे रद्द करून सर्वासाठी म्हणजे हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी, शीख आदींसाठी एकच एक कायदा आणणे म्हणजे समान नागरी कायदा पूर्णत: प्रस्थापित करणे. याची सुरुवात इस्लाममधील तिहेरी तलाक रद्द करण्यापासून व्हावी असे जर सर्वाना वाटत असेल, तर ते चांगलेच आहे. मुस्लिमांमधील अनेक सुधारणावाद्यांची तर ही जुनीच मागणी आहे. मुस्लीम महिलांच्या विविध संघटना त्यासाठी लढा देत आहेत. त्या लढय़ाला पाठिंबा देणे हे तमाम विवेकी नागरिकांचे कर्तव्य आहे. हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. गेल्या वर्षी त्याच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरोधात भूमिका घेतली होती. अत्यंत स्वागतार्ह असे ते पाऊल होते. शंका आहे ती त्याच्या बळकटपणाबद्दलची. याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेले विधान. तिहेरी तलाकच्या प्रश्नाकडे मुस्लिमांनी राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असे मोदी म्हणाले. याचा अर्थ या प्रश्नावर साधू, साध्वी आणि योग्यांनी जे रान उठविले आहे त्याकडे दुर्लक्ष करावे. मुळात हा असा प्रचार दोन्ही बाजूंच्या सोयीचा आहे. मुस्लीम प्रश्नात हस्तक्षेपाच्या आपल्या भूमिकेमुळे मुस्लीम सनातन्यांच्या संघटना बळकट होणार हे न समजण्याइतका बावळटपणा हिंदुत्ववाद्यांमध्ये मुळीच नाही. उलट तसे व्हावे म्हणून तर योगी आदित्यनाथांचा स्वामी प्रसाद मौर्य नावाचा भंपक मंत्री तिहेरी तलाकच्या नावाने विष ओकत आहे. अशा वक्तव्यांमुळे नुकसान तलाकपीडित महिलांचेच होणार आहे याची शुद्ध राजकारणाच्या नशेतील अनेकांना नसते. ती मायावतींच्या बसपमधून आयात केलेल्या या मंत्र्याला असेल असे मानण्यात अर्थ नाही. परंतु अशा नतद्रष्टांच्या म्हणण्यापेक्षा महत्त्व आहे ते मोदी यांच्या भूमिकेला. त्यांनी तिहेरी तलाक प्रथेच्या निर्मूलनासाठी मुस्लीम समाजातील विचारवंतांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांचे हे उद्गार आणि हिंदुत्ववाद्यांनी या मुद्दय़ावर चालवलेला कंठाळी प्रचार यांत मोठी विसंगती आहे. तिहेरी तलाकला सर्वोच्च न्यायालयात या पूर्वी विरोध करणारे मोदी सरकार आता हा प्रश्न मुस्लिमांतील सुधारणावादी विचारवंतांवर सोडत आहेत. एक तर मुस्लिमांमध्ये सुधारणावाद्यांना काहीही किंमत नसते आणि जे विचारवंत असतात ते मुल्ला आणि मौलवी. त्यांच्यासाठी एकूणच वैयक्तिक कायदा हा धार्मिक विषय असतो. अशा लोकांनी तिहेरी तलाकवर सहानुभूतीने विचार करावा असे मोदी यांचे म्हणणे असेल, तर ते स्वत:च या विषयाचे राजकारण करीत आहेत असे म्हणावे लागेल. यापूर्वी राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणात अशाच प्रकारे तुष्टीकरणाचे राजकारण करून मुस्लिमांतील सुधारणावादाला मूठमाती देण्याचे पाप केले. आता मोदीही हिंदू तुष्टीकरणासाठी तसेच काही करू पाहतील तर ते नंतर इतिहासाचे कितीही पुनर्लेखन केले तरी अक्षम्यच ठरेल.

भारतासारख्या देशात धार्मिक सुधारणा अशा मार्गाने होत नसतात, हे वास्तव एकदा सर्वानीच समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोक पुढे येतील आणि मग चर्चेच्या मार्गाने सतीप्रथा बंद करतील असे राममोहन रॉय यांना वाटले असते तर ही प्रथा कदापि बंद होती ना. कायद्यानेच अशा कुप्रथा बंद करायच्या असतात. आणि तिहेरी तलाकच्या प्रश्नात तर धर्माचाही संबंध येत नाही. कारण येथे ज्या प्रकारच्या कुप्रथेचा अवलंब केला जातो ती तलाक अल बिदा पद्धतच मुळात कुराणबा आहे. तरीही काही मुस्लीम धर्मपंडित यावरून शरियतमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याच्या बोंबा ठोकून समाजाला भडकावण्याचे काम करीत आहेत. त्यांना एकदा हे बजावून सांगावे लागेल, की शरियतचा ८० टक्के भाग भारतीय राज्यघटनेने केव्हाच रद्द केला आहे. उरलेल्या २० टक्क्यांतही मोठे बदल झाले आहेत. तरीही तुम्हाला शरियतची एवढीच ओढ असेल, तर मग ती सर्वच्या सर्वच लागू करण्याची मागणी करा. म्हणजे मग चोरीच्या शिक्षेबद्दल हिंदूला कारावास आणि मुस्लिमांचा हात तोडणे असा न्याय देता येईल. पण भारतीय मुस्लीम अशी मागणी करणार नाहीत. त्यांचे कट्टरतावादी नेते धमक्या मात्र जरूर देतील. त्यांना घाबरून काँग्रेसप्रमाणे त्यांचे लांगुलचालन करीत बसायचे की कायदा करून हजारो मुस्लीम महिलांचे आशीर्वाद घेतानाच संविधानावरील आदर दृढ करायचा हा खरा मोदींपुढचा प्रश्न असावयास हवा. जाहीरनाम्यातील घोषणाबाजी आणि प्रत्यक्षातील अंमलबजावणी हाच खाक्या याबाबतही सुरू ठेवला तर तो आपल्या ३१ टक्के मतदारांचा विश्वासघात ठरेल याचे भान मोदींनी ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्वात प्रथम अनुनयाच्या राजकारणाला तलाक द्यायला हवा. ते मोठे अवघड काम आहे. त्याऐवजी बाकीच्यांनी ओरडायचे आणि आपण चुचकारायचे हे धोरण सोपे. आता घटनापीठासमोर मोदींचे सरकार काय करते यावरून त्यांना हा सोपा मार्ग जवळचा वाटतो की काय हे दिसेलच. तेथे खरा छप्पन इंचाचा कस लागेल.

First Published on May 1, 2017 3:32 am

Web Title: pm narendra modi says dont politicise with triple talaq
 1. V
  vinod patil
  May 12, 2017 at 3:28 pm
  are kiti ha modi virodh tumacha just tumichi congress chi mentality ahe me tar suggest Karen kya hya paper pasun lamb raha murk
  Reply
  1. H
   Hemant Joshi
   May 2, 2017 at 11:28 am
   Halli Loksatta sampadakiya barech gondhalalele vatatat. Vidyaman shasanvyavasthechya virodha kahitari lihine ha ekakalmi karyakram asu nay.
   Reply
   1. H
    Hemant Kadre
    May 2, 2017 at 12:39 am
    मोदी हिंदूस्थानचे पंतप्रधान आहेत म्हणजे हिंदूस्थानातील मुस्लीमांचेही पंतप्रधान आहेत. मुस्लीम धर्मात सुधारणावाद्यांना स्थान नाही असे जर लोकसत्ताकारांना वाटते तर सुधारणा घडविण्याकरिता बिगर मुस्लीमांनाच प्रयत्न करावे लागतील असेच नां? तिहेरी तलाकबाबत मुस्लीम धर्मातील विचारवंतांनी समोर यावे असे मोदी म्हणाले असतील तर सरळसरळ त्याचे स्वागत करण्याऐवजी मोदींच्या छातीचे माप काढण्याची गरज नव्हती. असे काही खुसपटे संपादकीय वाचले की संपादकांच्या मेंदूच्या मापाचा अंदाज येतो व संपादकांच्या मेंदूला वाळवी तर लागली नाही नां? अशी शंका येते.
    Reply
    1. S
     shubham vijay
     May 1, 2017 at 5:41 pm
     lekh kasa vastunishth watat anhi.
     Reply
     1. N
      narendra
      May 1, 2017 at 4:52 pm
      Nothing wrong in appealing intelligentsia in Muslims to evoke their conscience and stand by the Muslim women folk to protect their human rights and stop the tradition of triple talaq which has been against the principle of justice and equal rights of muslim women.
      Reply
      1. L
       latika
       May 1, 2017 at 4:48 pm
       आपणच म्हणता सुधारणा वाद्याचा मुस्लिम धर्मात काहीही स्थान नाही. मग ही चूक मोदींची की हिंदू धर्माची ?
       Reply
       1. S
        sanjay telang
        May 1, 2017 at 4:14 pm
        Modi hya vishyavar consensus ananyacha prayatna karatayat mhanuanach rajakaran nako mhanale. jya patrakarana tyaat rajakaran karayache, tyani barobar thevadhech shabda uchalale. Geli Anke varshe 15 mate naa milvunahi rajya kelelyapeksha Modinchi 31 mate mhanje khupach zaali khare tar. Pan tarihi 69 virodhat asatana Modini ka bare nirnay ghyava?? Thani thambave thode , joparyant matadhikya 51 parmant jaat nahi tovar. Chaati kay ata 56 chi 56 ch rahanar. Ti kay kami honar nahi? Thodi vaadhali tar tumachyasarkhyana Oxygen milane kami hoil.
        Reply
        1. श्रीराम शेख
         May 1, 2017 at 3:44 pm
         ज ं तर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमतील नैतिक पत्रकारितेबद्दलचं एखादं पुस्तक परत वाचा राव. मोदीविरोधी अग्रलेख लिहुन तुमची छाती फुटायची वेळ आलीये. तिकडे लक्ष द्या जरा. प्रत्येक महिलेला तिचा मुलभुत हक्क मिळायलाच हवा. अन् त्याची सुरूवात मुस्लिम महिलांपासुन होत असेल तर तुमचा पोटशुळ उठण्याचे कारण नाही.
         Reply
         1. M
          Mujafar patel
          May 1, 2017 at 2:51 pm
          ulta chor kotwal ko date
          Reply
          1. S
           Saniya Sheikh
           May 1, 2017 at 1:54 pm
           Job ,job ,job, ,,,, agar aap apne android mobile se kamana chahate h paisa ,,,,, vo b PR months 15000-20000 rs ,,,.to aap (7066477590) is whatsapp number pe "job" aise likhakar bhej de ,,... Fir aapko kaam kaise karana h iski puri jankari Di jayegi ,,,,, bs aapko whatsapp or Facebook achhese chalana aana chahiye ,,,...
           Reply
           1. S
            Shriram Bapat
            May 1, 2017 at 12:41 pm
            हिंदुत्ववादी अशी भाजपाची विचारसरणी असल्याने भाजप सरकारमधील पंतप्रधान, मुख्यमंत्री हे मुस्लिमांविरुद्ध काहीतरी कडवट विधाने करतील आणि आपल्याला त्यांच्यावर सडकून टीका करायला संधी मिळेल असे माध्यमातल्या मोठ्या वर्गाला वाटत होते. पण मोदी, शिवराज चौहान वगैरे सोडा पण भगवी कफनी परिधान करणारे उ.प्र.चे मुख्यमंत्री सुद्धा तसे न वागता सामोपचाराची भाषा बोलत आहेत, अती उत्साही गोरक्षकांना तंबी देत आहेत हे पाहून या माध्यमांचा हिरमोड होत आहे. त्याचे दृश्य परिणाम आजच्या अग्रलेखात बघायला मिळतात. तिहेरी तलाक या मुस्लिम धर्मियातील अनिष्ठ प्रथेला मुस्लिम महिलांचाच विरोध आहे तेव्हा त्याविरुद्ध अन्य मुस्लिम काय म्हणतील याचा विचार न करता त्या प्रथेला बंदी घालण्याचा कायदा करण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे. अन्य पक्षातील सुधारक विचारांच्या नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला तर एकमताने तो कायदा संमत होईल. पण त्याच वेळी मुल्ला-मौलवी जे या प्रथेच्या बाजूने आहेत त्यांना आवाहन करून कटुता टाळता आली तर पहावे या हेतूने मोदींनी त्यांना आवाहन केले आहे हे चांगलेच आहे.
            Reply
            1. G
             Govind
             May 1, 2017 at 12:12 pm
             vuukle असतांना भाजपने मीडियावर पेरलेले अंधभक्त ट्रोल गिरीश कुबेर आणि लोकसत्तावर प्रतिक्रियेच्या बहाण्याने येथेच्छ दुगाण्या झाडत असत . आताच्या नवीन "Leave a Reply" मुळे सर्वांची गोची झालेली दिसते .
             Reply
             1. S
              Somnath
              May 1, 2017 at 12:01 pm
              छपन्न इंचावर घसरण्याऐवजी ज्याची कायम तळी उचलतात त्या बालबुद्धीच्या थोराड युवा नेत्याची जी काय इंचाची आहे ती फुगायला तुमच्यासारख्यांनी बाष्कळ लेख लिहून जोर लावला पण आहे त्या इंचामधून कधी फुसकुन हवा जाते हे त्यालाही कळत नाही आणि तुम्हाला सुद्धा. राजीव गांधीने बहुमत असूनही लाचारपणे मतांसाठी जे लोटांगण घातले त्याला तोड नाही.तेव्हाच जर प्रश्न सुटला असता तर छपन्न इंचावर घसरण्याची वेळ आली नसती. निदान छपन्न इंचामध्ये जोर आहे म्हणूनच विषय तरी चर्चिला जातोय आणि काय तो सकारात्मक निर्णय तरी येईल. निर्णय आल्यानंतर तो तुम्हाला पचनी पडणार नाहीच परंतु त्या निर्णयाची मोदी द्वेषातून चिरफाड करण्याचा तुमचा हक्क अबाधित राहील.तेवढाच लकवा भरलेल्या लेखणीला जोर येईल.शेवटी ३१ टक्क्यांवर घसरण्याची गरज नव्हती.
              Reply
              1. V
               vasudeo kelkar
               May 1, 2017 at 10:55 am
               tumchya sarkhe jeshtha patrakar mkuslim samjatil kharab chaliriti viruddha lihinyat aapli buddhimatta ka nahi vaaprat ?
               Reply
               1. V
                Vishal
                May 1, 2017 at 9:58 am
                Chan lekh aahe
                Reply
                1. A
                 AKIL SHAIKH
                 May 1, 2017 at 9:46 am
                 First thanx for editorial.after reading article I realise you are not able to understand the issue properly .if you have any muslim friend please ask him talaq proces in Islam. Your article shows narrowness and traditional way of blaming muslim. did you know what is Mehar!!! Do you know khula!!! Have you read census 2011 which show lest number of divorce happen in muslim!!! Again I request you to go through the Bhartiya mahila muslim morcha survey . Speak about 17000 muslim divorce women shows only three talak happen the way you presenting in your editorial. I hope you will be intellectually honest next time while writing on muslim issue. Thanx Shaikh AKIl.
                 Reply
                 1. S
                  Somnath
                  May 1, 2017 at 9:42 am
                  एखाद्या काँग्रेस पुढाऱ्याने स्वतःचे वृत्तपत्र काडून काँग्रेसचे लांगुलचालन करीत बसायचे की निःपक्ष पत्रकारितेला हरताळ फासायचा तशी अवस्था लोकसत्ताचे झाली आहे.निःपक्ष पत्रकारिता करून सुज्ञ वाचकांचे आशीर्वाद घेतानाच पत्रकारितेविषयी आदर दृढ करायचा हा खरा लोक सत्तापुढील प्रश्न असावयास हवा. प्रत्यक्ष बातमीचा कल,खरे खोटेपणा आणि लेख लिहिण्यातील हातोटी (द्वेषमूलक) हाच खाक्या लोकसत्ताने याबाबतही सुरू ठेवला तर तो आपल्या वाचकांचा विश्वासघात ठरेल याचेही भान लोकसत्ताने ठेवले पाहिजे.तेथे खरा लकवा भरलेल्या लेखणीचा कस लागेल.
                  Reply
                  1. S
                   Shriram Bapat
                   May 1, 2017 at 9:19 am
                   एकीकडे तिहेरी तलाक वर कायदा करून बंदी आणायची आणि त्याच वेळी संघर्ष टाळण्यासाठी मुस्लिमातील ज्या वर्गाकडून विरोध अपेक्षित आहे त्यांना या प्रश्नाचे राजकारण करू नका असे आवाहन करायचे यात मोदींचे काय चुकले ? तसेच हिंदूंमधील सनातनी लोक हुंडा-बंदी, स्त्री-भ्रूणहत्या याना विरोध करत नसून असंस्कृत लोक तसा विरोध करत आहेत. तेव्हा हिंदूंची विभागणी सनातनी विरुद्ध पुरोगामी अशी नसून सुसंस्कृत विरुद्ध असंस्कृत अशी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट मधील गैर व्यवहारांवर धर्मादाय आयुक्तांनी ओढलेले ताशेरे बघण्याचे सुद्धा तथाकथित पुरोगामी नाकारतात तेव्हा त्यांना पुरोगामी का म्हणायचे असा प्रश्न पडतो. ते निससंशय असंस्कृत आहेत.
                   Reply
                   1. S
                    sunil
                    May 1, 2017 at 9:14 am
                    Government has not abandoned the judicial process, this wrong impression is created by your writings.Modi trying to build consensus.Because people like Amir Khan,Shabana Azmi who have loud voices against so called "saffron brigade" are not showing any guts to speak against Mullas.Taslima Nasrin has pointed out the double standards of "seculars" when it comes to raising voice against in correct things happening from Muslm leaders, people .This issue touches the lifes of non Muslims also & gives rise to crime in many cases.Now that many Muslim boys are marrying non muslim girls,it is observed in many cases that it is their second marraige & they have abondended their first Muslim wife easily by misusing triple talaq.Many non muslim girls are getting trapped into it.Please remember , Newspapers were started to raise social issues. But now-a-days they involve only in politics,& your newspaper is at forfront of politicising evrything & is always trying to paint presnt government as fascist.
                    Reply
                    1. T
                     Tempo Inst
                     May 1, 2017 at 8:55 am
                     योग्य विचार
                     Reply
                     1. S
                      sandeep
                      May 1, 2017 at 8:46 am
                      sadetod lekh
                      Reply
                      1. Load More Comments