एअरटेलचे प्रति सेकंद देयक

मोबाईल ग्राहकसंख्येतील क्रमांक एकच्या भारती एअरटेलने नव्या मोबाईल दरयुद्धाला वाट करून दिली आहे. कंपनीने देशभरातल्या सर्व प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद देयक योजनेमध्ये सहभागी करून घेताना ‘वापराल त्याचेच पैसे भरा’ ही नवी संकल्पना सादर केली आहे.
या उपक्रमाची घोषणा करताना भारती एअरटेलच्या (भारत आणि दक्षिण आशिया) व्यवसाय विभागाचे संचालक अजय पुरी म्हणाले, नेटवर्कचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच विस्तृत आणि भक्कम नेटवर्क अधिक चांगले बनण्यासाठी वेगवेगळ्या साइट्स स्थापित करण्यासाठी आम्ही मोठी गुंतवणूक करत असून आता प्रति सेकंद योजनेद्वारे मोबाइल ग्राहकांना ते आता वापरतात इतकेच पसे भरावे लागणार आहेत.
‘वापराल त्याचेच पैसे भरा’ हा उपक्रमही त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल असून एअरटेलचे आणखी प्रीपेड मोबाइल ग्राहक प्रति सेकंद बििलग योजनेकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यामुळे ग्राहकांचा ‘स्टॅण्डर्ड बेस रेट प्लान’ आता दर सेकंदाच्या ‘पल्स रेट’मध्ये रूपांतरित होऊन आवडीचा अतिरिक्त ‘टॅरिफ डिस्काऊण्ट पॅक’ही घेऊ शकतात; त्यामुळे त्यांना प्रति सेकंद सवलत किंवा प्रति मिनिटचे फायदे मिळतील, असेही अजय पुरी म्हणाले.