किलरेस्कर ब्रदर्स लिमिटेडने (केबीएल) महिला सबळीकरणाच्या दिशेने पाऊल म्हणून आपल्या कोइम्बतूर येथे सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या बळावर उत्पादन प्रकल्प चालविण्याचे ठरविले आणि ज्या ठिकाणी असेम्ब्ली लाइन एका पंपाच्या जोडणीसाठी ६० सेकंदाचा वेळ लागत असे, तो सरासरी १७.२५ सेकंदापर्यंत घटविण्याचे कार्यात्मक यश संपादित केले. प्रत्यक्षात कार्यक्षमतेत तीन पटींनी वाढीस मदतकारक ठरलेल्या या ‘महिला मिशन २०’ उपक्रमाला ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने अलीकडेच महिला सबळीकरणाला समर्पित प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरविले आहे.
केबीएलच्या कोइम्बतूर प्रकल्पात स्थानिक पंपाच्या विविध मॉडेल्स उत्पादन हे तेथील शॉप-फ्लोअरवर कार्यरत १९ ते ३० वर्षे वयाच्या ६५ स्त्रियांकडून घेतले जाते. पण प्रति पंपाच्या जोडणीस २० सेकंदांपेक्षा कमी वेळ या उद्योगक्षेत्रातच केवळ दुर्मीळच असून, ती किमया या स्त्री कर्मचाऱ्यांमुळे वास्तवात आली असल्याचे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किलरेस्कर यांनी सांगितले.
या कार्यक्षमतेपायी या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढून दरमहा ३४ हजार पंप प्रति लाइन अशी कल्पनातीत वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.