खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेने १८ वर्षांखालील मुलांसाठी ‘यंग चॅम्प’ नावाने बचत खाते योजना सुरू केली आहे. हे खाते निवासी तसेच अनिवासी मुलांना उपलब्ध आहे. १० वष्रे आणि त्याहून अधिक वयाची मुले हे खाते स्वतंत्रपणे उघडू शकतात आणि व्यवहारही करू शकतात. यानिमित्ताने ‘यंग चॅम्प’ डेबिट कार्डही तयार करण्यात आले असून यात एटीएम आणि पीओएसच्या माध्यमातून २,५०० रुपयांच्या खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक कामकाजासाठी दरमहा ५० हजार रुपयांपर्यंत मोफत ड्राफ्ट, पीओएसमार्फत केलेल्या खर्चासाठी ‘रिवॉर्ड पॉइंट’ यांचा अन्य युवास्नेही उत्पादन वैशिष्टय़ांमध्ये समावेश आहे. या उत्पादनाची सुरुवात करताना बँकेच्या किरकोळ व्यवसाय विभागाचे प्रमुख ए. सुरेंद्रन यांनी सांगितले की, ‘यंग चॅम्प अकाऊंट’ हे मुलांमध्ये बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या सवयी रुजवणारा एक महत्त्वाचा भाग म्हणून आम्हाला काम करता येईल.