भारताच्या बँकिंग क्षेत्रात चार वर्षांच्या कालावधीनंतर ताबा आणि विलीनीकरणाचा व्यवहार घडला असून कोटक महिंद्र व आयएनजी वैश्य या दोन खासगी बँका एकत्र आल्या आहेत. आएनजी वैश्य बँकेच्या संपादनाने कोटक महिंद्र बँक ही खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस बँकेनंतर चौथ्या क्रमांकाची बँक बनणार आहे. हा खरेदी व्यवहार संपूर्णत: समभागांच्या रूपात होणार आहे.
कोटक महिंद्रचा हा पहिलाच बँक व्यवसाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. यामुळे बँकेच्या शाखा १,००० च्या पुढे गेल्या आहेत. विलीनीकरणापश्चात आयएनजी वैश्यच्या भागधारकांना १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक १,००० समभागांमागे कोटक महिंद्र बँकेच्या ५ रुपये दर्शनी मूल्याचे ७२५ समभाग प्राप्त होणार आहेत.
उभय बँकेच्या भागधारकांच्या मान्यतेनंतर हा विलीनीकरण व्यवहार पूर्णत्वास येईल, असे कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष उदय कोटक यांनी गुरुवारी सायंकाळी उशीरा झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या विलीनीकरणाला भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेची तसेच भारतीय स्पर्धा आयोगाकडून वैधानिक परवानगी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
उभय बँकांच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बँकिंग क्षेत्रात होती. गुरुवारी व्यवहारादरम्यान आयएनजी बँकेनेही मुंबई शेअर बाजाराला याबाबत सूचित केले होते. तत्पूर्वी, याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी उभय बँकांच्या संचालक मंडळाची बैठकही झाली.
आयएनजी समूहातील मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (म्युच्युअल फंड) नुकतीच आदित्य बिर्ला समूहातील बिर्ला सन लाइफ कंपनीने ताब्यात घेतली आहे. विलीनीकरणाच्या घोषणेनंतर कोटक महिंद्र बँक व महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी उदय कोटक यांचे ‘ट्विटर’वरून अभिनंदन केले. बँकिंग क्षेत्रात यापूर्वी २०१० मध्ये खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने बँक ऑफ राजस्थान ही उत्तरेतील बँक ताब्यात घेतली होती.
समभाग मूल्य वार्षिक उच्चांकाला!
संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने बाजारात सूचिबद्ध दोन्ही बँकांच्या समभागांचे मूल्य ७ टक्क्यांपर्यंत उंचावले. व्यवहाराची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी, मुंबई शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले. पण दिवसअखेर आयएनजी वैश्य बँकेचा समभाग ७.१५ टक्क्यांनी वधारून ८१४.२० रुपयांवर तर कोटक महिंद्र बँकेचा समभाग ७.२८ टक्क्यांनी वाढून १,१५७.०५ रुपयांवर स्थिरावलेला दिसला. हे त्या समभागांच्या भावातील वार्षिक उच्चांक आहेत.

 

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी