‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे प्रकाशन आणि गुंतवणूकदार जागर मंगळवारी प्रभादेवीमध्ये

वार्षिक २,५०० ते १२,५०० रुपयांची बचत देऊ करणारा यंदाचा अर्थसंकल्प मध्यम पगारदार करदात्यांना दिलासा देणारा ठरला. गुंतवणुकीसाठी हितकारक तरतुदी घेऊन आलेल्या या अर्थसंकल्पातून प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकाला विधायक दिशा जरूरच मिळेल. ती कशी याचे नेमके दिशादर्शन ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ गुंतवणूकदार मेळावा देणार आहे.

अर्थसंकल्पातील बदलेल्या तरतुदीने २०१७-१८ सालात वैयक्तिक आर्थिक नियोजन कसे करावे. तसेच या वर्षांत भांडवली बाजार वा अन्य पर्यायातून आपली गुंतवणूक अधिक लाभदायी कशी करून घ्यावी, याचे उत्तर असलेल्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाचे प्रकाशनही या निमित्ताने होत आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक आणि अर्थनियोजनाचे दिशादर्शन’ हा  या अर्थसाक्षरतेचा जागरा मंगळवार, २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम), मुंबई येथे होत आहे. या उपक्रमाचे सहप्रायोजक गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज हे आहेत. तर पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स असून, बँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड आहे.

अर्थनियोजनाविषयी मराठी अर्थजगतातील वार्षिकांक ‘अर्थब्रह्म २०१७’च्या प्रकाशनानंतर, या कार्यक्रमात, अर्थसंकल्पानंतरच्या गुंतवणुकीवर तज्ज्ञ वक्ते भाष्य करतील. अजय वाळिंबे (भांडवली बाजारातील गुंतवणूक), तृप्ती राणे (कुटुंबाचे अर्थनियोजन) व प्रवीण देशपांडे (गुंतवणुकीसह करबचतही महत्त्वाचीच) हे विषयानुरूप मांडणी करतील आणि नियोजनाची आगामी दिशा स्पष्ट करतील. श्रोत्यांना त्यांच्या नेमक्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरही यावेळी तज्ज्ञांकडून मिळविता येईल. बचत, गुंतवणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शक ठेवा ठरणाऱ्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’मधील वैशिष्टय़ेही यावेळी अधोरेखित केली जातील.

untitled-18