‘मारुती सुझुकी ऑटोकार यंग ड्रायव्हर’चे पुनरागमन होत आहे. यंदाचे हे सहावे वर्ष असून, या निमित्ताने मारुती सुझुकी आणि ऑटोकार इंडिया पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ही स्पर्धा भारतात जुलै आणि ऑगस्ट २०१४ मध्ये तीन टप्प्यात आयोजित केली जाते, ज्याचा अंतिम सोहळा नवी दिल्लीमध्ये पंचतारांकीत ठिकाणी आयोजित करण्यात येतो. कार्यक्रमाचे आयोजन मारुती सुझुकी आणि ऑटोकार इंडियाद्वारे मिळून केले जाते, युवकांना जबाबदारीने वाहन च्लविण्याचे महत्त्व जाणवून देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
स्पर्धेमध्ये तीन विविध टप्पे आहेत, रस्ता सुरक्षा, ड्रायव्हिंग कौशल्य आणि रहदारीचे नियम याबाबत स्पर्धकांमधील जागरुकता जाणण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ४२ शहरांमध्ये असलेल्या मारुती ड्रायव्हिंग स्कूल (एमडीएस) मध्ये या परिक्षा आयोजीत करण्यात येतील. वैध वाहनचालकाचा परवाना असलेले १८ ते ३० वर्षे वयोगटातील वाहनचालक या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. पहिल्या टप्प्यात http://www.youngdriver.in या संकेतस्थळावर नोंदणी करणारे स्पर्धक सामील होतील. त्यांची क्वीझ स्वरुपातील ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. दुसऱया टप्प्यात कौशल्य परीक्षा होईल, ज्यामध्ये ४२ शहरांमध्ये असलेल्या कोणत्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याबाबतची परीक्षण घेण्यात येईल. तिसऱया टप्प्यातील स्पर्धक अंतिमस्पर्धेसाठी दिल्लीला जातील. अंतिम स्पर्धेत वाहन चालविताना बाळगायची सुरक्षा, वाहनावरील नियंत्रण, आणि वाहन चलविण्यासाठीच्या अन्य नियमावलीबाबतची परिक्षा घेण्यात येईल, यासाठी २० प्रकारचे मापदंड असतील. शेवटच्या टप्प्यामध्ये, विजेत्याला “मारुती सुझुकी-ऑटोकार यंग ड्रायव्हर ऑफ द इयर २०१४’’चा किताब प्रदान केला जाईल. विजेत्याला नवीन मारुती सुझुकी ऑल्टो 800 घरी घेऊन जाण्याची संधी मिळेल. तर, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://www.youngdriver.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
या उपक्रमाविषयी बोलताना ऑटोकार इंडियाचे संपादक श्री. होर्माझ्ड सोरबजी म्हणाले, “ऑटोकार इंडियाच्या या उपक्रमाला मिळालेले मारुती सुझुकीचे सहाय्य ही अभिमानाची गोष्ट आहे. युवा वाहनचालकांना खराब व धोकादायक ड्रायव्हिंगच्या जोखीमेबाबत जागरुक करणे हे यावर्षीच्या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. जबाबदारीने वाहन चालविणे हे आपले कर्तव्य आहे. या उपक्रमाद्वारे देशातील युवकांपर्यंत पोहचून, वाहन चालविताना बाळगण्याची सुरक्षितता आणि रस्त्यावरील नियमांचे पालन करण्याबाबत त्यांच्यात जगृतता निर्माण करू शकण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
याविषयी बोलताना मारुती सुझुकी इंडियाचे विपणन व विक्री विभागाचे मुख्य अधिकारी श्री. मयंक पारीक म्हणाले, “मारुती सुझुकी सुरक्षित ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यामध्ये दृढ विश्वास ठेवते. ऑटोकार इंडियाचा देखील हाच दृष्टिकोन आहे. युवकांना सुरक्षितपणे ड्राइव्हिंग करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी हा उत्कृष्ट उपक्रम आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी लोकांची मदत करण्याच्या कटिबद्धतेमुळे ऑटोकार इंडिया आणि मारुती सुझुकीने अशाप्रकारचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. ‘एमव्हायडी’चा विजेता सुरक्षित ड्रायव्हिंगचा चेहरा बनेल. नवीन कार जिंकण्याबरोबरच त्याला सुरक्षेचा चेहरा म्हणून माध्यमांसमोर येण्याची संधी मिळेल.’’
ऑटोकार इंडियाने हल्लीच “द अनकूल मोमेंट्स’’ स्पर्धेचे आयोजन केले होते. ही फेसबुक आधारित अनोखी स्पर्धा होती, ज्यामध्ये स्पर्धकांना ऑटोकार इंडियाच्या फेसबुक पेजवर बेजबाबदार ड्रायव्हिंगचे फोटो आणि व्हिडिओ टाकण्यास सांगण्यात आले होते. या उपक्रमाला युवांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. असुरक्षित ड्रायव्हिंग कसे अयोग्य आहे हे सांगण्याचा या उपक्रमाद्वारे प्रयत्न करण्यात आला होता.