विविध उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या प्लास्टिकशी संबंधित सर्व भागीदारांचे व्यासपीठ असलेल्या प्लास्टइंडिया फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी के. के. सक्सेरिया यांची निवड झाली आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीसाठी निश्चित झालेल्या कार्यकारिणीत राजीव रावल हे उपाध्यक्ष तर राजू देसाई हे खजिनदार म्हणून निवडले गेले आहेत. सुभाष कडाकिया यांच्याकडून सस्केरिया यांनी नुकतीच नव्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. पदाधिकाऱ्यांची निवड ही एकमताने झाल्याचे फाऊंडेशनने कळविले आहे.
देशातील प्लॅस्टिक उद्योगाची तसेच प्रमुख सात राष्ट्रीय महासंघाची प्लास्टइंडिया फाऊंडेशन ही शिखर संस्था असून या मंचातर्फे नियमित प्लॅस्टिकविषयक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनही भरविले जाते. भारतीय प्लॅस्टिक उद्योग हा सरकारला ९०,००० कोटी रुपये महसूल मिळवून देणारा उद्योग आहे. वार्षिक १५ टक्के दराने हे क्षेत्र विकसित होत आहे. नवनियुक्त अध्यक्ष सक्सेरिया हे उमा प्लास्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर रावल हे विशाखा इरिगेशनचे कार्यकारी संचालक आहेत. संघटनेचे खजिनदार राजू देसाई हे ज्योती समूहात कार्यकारी संचालक आहेत.