पेस्तनजी समूहाचे गोसिप आइस्क्रीम आणि बेव्हरेजेस श्रेत्रातील पेस्तनजी समूहाने दुधाच्या अर्कातील गोसिप हे नवे पेय बाजारात आणले आहे. पश्चिम भारतात हे उत्पादन वितरित करण्यात येणार आहे. गोड पेय असलेल्या गोसिपमध्ये दुधाबरोबरच साखर तसेच विविध फळांची चव समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये चॉकलेट, आंबा, स्ट्रॉबेरी, कॉफी, अननस, पिस्ता आदींचा समावेश आहे. तिच्या २०० मिलीच्या बाटलीची किंमत २२ रुपये आहे.किचनएडचा हॅण्ड ब्लेण्डरविद्युत उपकरणनिर्मितीतील आघाडीच्या व्हर्लपूलने १९८६ मध्ये ताबा मिळविलेला किचनएड हा ब्रॅण्ड भारतात सादर केला. याअंतर्गत कंपनीने मिक्सर ऑक्टोबर २०१३ मध्ये आणला होता. आता स्वयंपाकघरात लागणारा बहुपयोगी अशा हॅण्ड ब्लेण्डर सादर करण्यात आला आहे. मास्टरशेफ विकास खन्ना यांच्या प्रात्यक्षिकासह तो मुंबईत नुकताच बाजारात आणत असल्याचे घोषित करण्यात आले. त्याची किंमत १९,९९० रुपये आहे.नाईल नॅचरल्स शाम्पूची नवी ऑफरकेविनकेयरचा अग्रगण्य हेअर केअर ब्रँड असलेल्या नाईलने आपणाकरिता नवी ऑफर सादर केली आहे. आता ग्राहकांना १८० मिली नाईल नॅचरल्स शाम्पूसोबत १५ रूपयांचा ‘इंडिका १० मिनीट्स पावडर हेअर कलर’ मोफत मिळणार आहे. ही ऑफर नाईल नॅचरल्स स्ट्राँग अँड स्मूथ, नाईल नॅचरल्स ड्रायनेस कंट्रोल, नाईल नॅचरल्स हेअरफॉल डिफेन्स आणि नाईल नॅचरल्स लाँग अँड बाऊन्सी तसेच नाईल क्लिन अँड शाईन अशा नाईल नॅचरल्स शाम्पूच्या सर्व प्रकारांकरिता लागू आहे.