चलनी नोटांवरील रिक्त जागेत काहीही न लिहिण्याचे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेने पुन्हा एकदा केले आहे. खोटय़ा नोटा ओळखण्यासाठी या जागेचा उपयोग होतो; तेव्हा त्यावर काहीही लिहू नये, असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. नोटांच्या पांढऱ्या जागेत आकडे अथवा अक्षरे नोटा बाळगणाऱ्यांकडून लिहिले जातात. या जागेत नोटांचा खरेपणा ओळखण्यासाठीच्या काही चिन्हांचा अंतर्भाव त्याची छपाई करताना केलेला असतो. मात्र त्यावर काही लिहिले गेल्यास ते ओळखणे कठीण जाते.