भारतीय स्मार्टफोन बाजारहिश्श्याच्या मक्तेदारीवरून देशी-विदेशी कंपन्यांमध्ये संघर्ष सुरू असतानाच टॅबलेट क्षेत्रात मात्र मूळच्या कोरियन कंपनी सॅमसंगचाच वरचष्मा असल्याचे ‘सायबरमीडिया रिसर्च’ने मान्य केले आहे. गॅझेट अभ्यासक या संस्थेच्या २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, १९.२ टक्के बाजारहिश्श्यासह सॅमसंग अव्वल स्थानावर आहे. 

२०१४ मध्ये एकूण भारतीय टॅबलेट बाजारपेठ ही ९.२ टक्क्यांनी वाढली असून देशात या कालावधीत ३८.९० लाख टॅबलेट असल्याचे म्हटले गेले आहे.
पैकी १९.३ टॅबलेट हे थ्रीजी तंत्रज्ञानावर चालू शकणारे आहेत. वार्षिक तुलनेत त्यांचा हिस्सा ४९.७ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ मध्ये आयबॉलने १५.६ टक्के बाजारहिश्श्यासह सॅमसंगला मागे टाकल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी ‘आयडीसी’ने केला होता.
6