आघाडीचे आणि विश्वासपात्र विकासक म्हणून नाव कमावणाऱ्या विना डेव्हलपर्सने त्यांच्या वसई (पूर्व) येथील प्रतिष्ठित विना डायनॅस्टीमध्ये घराचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना भली मोठी बचत करण्याची संधी देणारी योजना प्रस्तुत केली आहे.
नवरात्रौत्सवात म्हणजे २३ ऑक्टोबपर्यंत येथील एक आणि दोन बीएचके घरासाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मूल्यवर्धिक कर, सेवा करातून माफीसह, वरच्या मजल्यांवरील तसेच पसंतीचे घर निवडताना जादा किंमत न आकारण्याची विकसकांनी हमी दिली आहे.
या गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णही झाला असून, तेथे केवळ कपडय़ानिशी खरेदीदारांना येऊन राहता येईल, अशा सोयी केल्या गेल्या आहेत. प्रत्येक दिवाणखान्यात आवश्यक ते फर्निचर, सोफा सेट, डायनिंग टेबल, एलईडी टीव्ही संचासह टीव्ही युनिट, सेंट्रल टेबल, यूपीएस इन्व्हर्टर आणि खिडक्यांचे पडदे, मॉडय़ूलर किचनने सुसज्ज स्वयंपाक घर, वॉशिंग मशीन, कूक टॉप, मायक्रोवेव्ह आणि रेफ्रिजरेटर, निजघरात गाद्यांसह बेड, पडदे, ड्रेसिंग टेबल, वारड्रोब आणि डोळ्यांना सुखावणारे वॉलपेपरची सजावट केली गेली आहे. याच सोयी दुसऱ्या टप्प्यातील खरेदीदारांनाही मिळतील, शिवाय खरेदीसाठी १०:८०:१० धाटणीची सुलभ योजनाही दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या सहयोगाने राबविली जात आहे.