उमरगा न्यायालयाचा निकाल

उमरगा तालुक्यातील मूळज येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून पेपर संपल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या मुलींची रिक्षा अडवून त्यांची छेड काढणाऱ्या तिघांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली. इतर आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर बाल न्यायालयात खटला सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी या गावगुंडांनी मुलींच्या छेडछाडीस मज्जाव करणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनाही बेदम मारहाण केली होती.

pm narendra modi
मोदींना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; न्यायमूर्ती म्हणाले…
man arrested from gujrat after 12 years in wife assulting case
पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा

या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

कोपर्डी प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर शाळकरी मुलींची छेड काढल्याप्रकरणी उमरगा तालुका न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. छेडछाड व विनयभंग करणाऱ्या सचिन गोिवद जमादार, प्रकाश रमेश वडदरे आणि विष्णू शेषेराव भोसले या तिघांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा उमरगा न्यायालयाने सुनावली. २० मार्च २०१५ रोजी दहावीचा पेपर संपल्यानंतर उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील विद्याíथनी परीक्षा केंद्र असलेल्या मुळजहून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गावाकडे परतत होत्या. त्याच वेळी मुळज येथील काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. छेड काढल्यानंतर त्रिकोळी येथील मुलांनी पुढे येत हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मुलांची मध्यस्थी सहन न झाल्यामुळे सहाआसनी रिक्षाने गावाकडे निघालेल्या मुलींना मुळज येथील ओढय़ाजवळ सायकल आडवी लावून गावगुंडांनी अडविले आणि रिक्षातून खाली उतरवून या मुलींना बेदम मारहाण केली होती.

मारहाण करणाऱ्या सहा जणांपकी एकाला जागेवर पकडून मुलींनी चोपही दिला होता. त्याला पोलिसाच्या ताब्यात दिल्यानंतर त्रिकोळी गावातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या धरून मुलींना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

या मारहाणीत नऊ मुली आणि तीन मुले जखमी झाले होते. या प्रकरणी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक विश्वजित दुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश तुकाराम मिस्त्री, नितीन दगडू जमादार, लक्ष्मण जमादार, विष्णू जमादार, सचिन जमादार आणि प्रकाश वडतरे या गावगुंडांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.