26 June 2017

News Flash

BMC election 2017 : मुंबईत दोन कोंबड्यांची झुंज; राज ठाकरेंनी डागली भाजप, शिवसेनेवर तोफ

विक्रोळीतील कन्नमवारमध्ये 'राजगर्जना'

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: March 7, 2017 2:12 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

मुंबईतील विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये प्रचार सभा घेऊन राज ठाकरे यांनी मनसेच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्याच सभेत भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणाचा मुंबईकरांच्या जगण्याशी काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दोन कोंबडे झुंजत होते, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपवर तोफ डागली. यावेळी त्यांनी नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. नोटबंदीनंतर पंतप्रधान म्हणाले की, नवीन वर्षात नवा भारत दिसेल. पण बदल कुठे आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने प्रत्येक उमेदवाराला एक कोटी दिले होते. आज उत्तरप्रदेशात भाजपचे ४०० उमेदवार उभे आहेत, मग ४०० कोटी कुठून आले? असा सवालही त्यांनी केला. नोटबंदीमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. हजारो लोक बेरोजगार झाले. रांगेत अनेक लोकांचा बळी गेला. याबाबत कोणी काही बोलत नाही. पारदर्शी कारभार देऊ असे भाजपकडून सांगितले जाते. पण पारदर्शी कारभार कसा देणार? नोटबंदी नक्की का केली? बनावट नोटा कालच पकडल्या गेल्या, मग काय बदल झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

भाजपचा ‘पार्टी विथ डिफरन्स’चा अर्थ एवढाच की भाजपकडे पैसा आहे, तुमच्याकडे नाही. हाच तो डिफरन्स आहे. नुसती पॅकेजची आश्वासने द्यायची. पण सरकारकडे पैसे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी आठ हजार कोटी लागतील, असे सांगितले जाते. तेवढे पैसे आहेत का, असा सवाल त्यांनी भाजपवर केला. मुंबई महापालिकेचे ३७,५०० कोटी रुपये बजेट आहे. पगार आणि इतर खर्च वगळून १५,००० कोटी उपलब्ध होतात. मग पाच वर्षांतील ७५, ००० कोटी गेले कुठे? भाजप – शिवसेनेकडून अनेक आश्वासने दिली जातात. मग गेली पाच वर्षे काय केले? मी जे पाच वर्षांत नाशिकमध्ये करून दाखवले ते यांना २५ वर्षांत करता आले नाही. मुंबईत मराठी शाळा बंद होत आहेत, मात्र उर्दू शाळांची संख्या वाढत आहेत, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

नाशिकमधील विकासकामांबाबतही त्यांनी माहिती दिली. नाशिकच्या पाच वर्षांच्या काळात १८ महिने आयुक्त नसताना विकासकामे सुरू ठेवली. नाशिकमध्ये मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकत आहे. त्यामुळे पुढील ४० वर्षे पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. नाशिकमधील रस्त्यांवर एकही खड्डा सापडला नाही. नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनचे काम पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. राज्यात कोणत्याही शहरात बोटॅनिकल गार्डनसारखे उद्यान आहे का, ते दाखवावे, असे आव्हान त्यांनी विरोधी पक्षांना दिले.

भाजपवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीच्या काळात फक्त जाहिराती आणि सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर विकासकामे करून काय उपयोग आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. १९५२ साली स्थापन झालेल्या भाजपला स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत. म्हणून ते पळवापळवी करतात, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेवरही त्यांनी टीकेचा ‘बाण’ सोडला. शिवसेनेचा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्यावर डोळा आहे. मग महापौरांना राणीच्या बागेत पाठवणार का? राणीच्या बागेत मग महापौर हा एकच प्राणी असेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मुंबईत भावी पिढीसाठी काही घडवायचे असेल तर, महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकर मतदारांना केले.

First Published on February 14, 2017 7:07 pm

Web Title: bmc elections 2017 live mns raj thackeray campaign rally in vikroli
 1. P
  Prasad
  Feb 14, 2017 at 2:15 pm
  राज साहेब , ते प्रयत्न तरी करता आहेत . नकला करून, हशा टाळ्या मिळवून प्रश्न सुटत नाहीत.
  Reply
  1. P
   Prasad
   Feb 15, 2017 at 6:40 am
   मत. पण १७ वर्षे पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधींचे राज ठाकरे कौतुक करतात.. मग ५ वर्षे थांबायला काय हरकत आहे ? इंदिरा गांधी "गरीबी हटाव' म्हणाल्या पण गरीबी कोठे हटली ? हा प्रश्न राज ठाकरेंना पडत नाही.
   Reply
   1. R
    rajendra
    Feb 15, 2017 at 2:22 am
    झोपी गेलेलं कोंबड युवराज जागं झालं अन खडबडून बेसूर आरवलं कि एकच अंड्याचे दोन दोन कोंबड कंवा अन कशी झालं ? आता ते दोघंबी माज्याकड शिल्लक उरलेल्या कोंबडयांना भुलवून कॉक कॉक करीत आपल्या कवेत घेनार कि राव ! आता मी एवढा 'बाहूबोली' कोंबड माज्यासंगत रंगायचे सोडून गेल्या तिथं..जाऊदे.. आपण आता परत एक छानशी डुलकी घेऊन डायरेक्ट २०१९ ला आरवतो, मग बगतो ा कोणी दाणे टाकतो का तोवर हे नाशिकचे शिळे बेदाणे कॉक कॉक टिपून जैसे थे राहू !!
    Reply
    1. R
     RAMAN
     Feb 14, 2017 at 3:19 pm
     अरे खरं बोलता आहेत ते ....भट आणि शेट लोकांचा भाजप आता गुंडा चां पक्ष झाला हे त्रिवार सत्य आहे, एकवेळस भट/शेट चालले असते पण गुंड नको रे बाबा,...
     Reply
     1. S
      Samadhan Dupargude
      Feb 14, 2017 at 3:08 pm
      हेच राज ठाकरे निवडणुकीच्या अगोदर मोदींचे गुणगान गायचे अन मंत्री लोकांसोबत भेटी गाठी करायचे अन आता टीका करता आहेत. लोकांना किती दिवस असेच वेड्यात काढणार माहिती नाही अन लोकपण किती दिवस वेडे बनत राहणार आता हे 'राज' कारणी लोकच जाणो. एक त्रस्त नागरिक
      Reply
      1. S
       shankar
       Feb 14, 2017 at 5:49 pm
       राज साहेब .मी खूप खूप आभारी आहे तुमचे. आमच्या साठी आणि आपल्या शहरासाठी तुम्ही खूप खूप कभड कास्ट केले.
       Reply
       1. मोडीभक्त
        Feb 14, 2017 at 3:52 pm
        राज ठाकरे गुड batting . बाजप ने नागपुरात काय काम केले ते विचार ह्या शेंबड्याना. नुसते बोलंघेवडे आहेत बाजप वाले.
        Reply
        1. S
         sudhara
         Feb 15, 2017 at 5:11 am
         केंद्रात मजबूत सरकार यावे म्हणून राज ठाकरे २०१४ च्या निवडणुकीत मोदींचे गुणगान गायले
         Reply
         1. V
          Vinayak
          Feb 14, 2017 at 3:36 pm
          राज साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व उमेदवार मागे घ्या आणि सेनेला सपोर्ट करा. तुमचे मराठी माणसावरील प्रेम व्यक्त करण्याचा असा चान्स पुन्हा नाही मिळणार. शिवसेने जिंकणार आहेच त्याचे वाटेकरी बना. आमचा तुमच्यावर लोभ आहेच पण यावेळी मत नाही. माफ करा. कारण या वेळेस मनसेला वोट म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपाला वोट. विधानसभेची चूक करू नका राजसाहेब. कृपया रागावू नका, विचार मात्र करा.
          Reply
          1. V
           Viren Narkar
           Feb 14, 2017 at 4:57 pm
           ही लढाई दोन कोंबड्यामधली नाही आहे तर महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे. जर शिवसेना ही लढाई हरळी तर महाराष्ट्राचे तुकडे निश्चित आनंद कदाचित मुंबई केंद्रशासित होणार हे तुला काळात नाही? तुझे मनसैनिंक देखील शिवसेनेलाच मतदान करणार कारण महाराष्ट्र वाचविण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र
           Reply
           1. Load More Comments