इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)तर्फे अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, इंदोर, काशीपूर, कोझीकोड, लखनऊ, रायपूर, रांची, रोहतक, शिलाँग, त्रिचरापल्ली व उदयपूर येथे उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट- कॅट : २०१४ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी  पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कॉमन एन्ट्रन्स टेस्ट अंतर्गत निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा प्रमुख महानगरांसह देशातील ९९ परीक्षा केंद्रांवर निवड परीक्षेसाठी १६ ते २२ नोव्हेंबर २०१४ रोजी बोलाविण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना समूहचर्चा आणि मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
आयआयएमच्या ‘कॅट’-२०१४ या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे विद्यार्थ्यांना इतर व्यवस्थापन संस्थांच्या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : प्रवेश अर्जासह नोंदणी शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी १,६०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी ८०० रु.) भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या http://www.icar.org.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१४ आहे.