अंतिम मुदत –
अर्जदारांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०१३ आहे. मात्र या शिष्यवृत्तीबरोबरच अर्जदाराला सायन्सेस पो या संस्थेकडे       पीएच. डी.च्या प्रवेशासाठी ४ एप्रिल २०१३ पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे

पॅरिसमध्ये नव्यानेच सुरू केलेल्या मॅक्स प्लँक सायन्सेस पो सेंटर ‘मॅक्स पो’ या समाजशास्त्रातील संशोधन संस्थेकडून समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी १५ मार्च २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी –
फ्रान्सची ‘सायन्सेस पो’ व जर्मनीमधील मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर द स्टडी ऑफ सोसायटीज’ या दोन शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या अग्रणी संस्थांनी एकत्र येऊन गतवर्षी एका नवीन संस्थेची म्हणजे ‘मॅक्स प्लँक सायन्सेस पो सेंटर’ची स्थापना केली. ही संस्था सर्वत्र ‘मॅक्स पो’ या नावाने परिचित आहे. फ्रान्स व जर्मनी या दोन देशांना समाजशास्त्रातील उत्कृष्ट संशोधनाची पाश्र्वभूमी आहे. या दोन प्रमुख राष्ट्रांमधील समाजशास्त्रातील हे सहकार्य युरोपमधील मूलभूत संशोधन अजून विकसित होण्यासाठी नक्कीच गरजेचे आहे. एकूणच ‘मॅक्स पो’चे हे केंद्र युरोपीय संशोधनासाठी मोलाचे योगदान देणारे ठरणार आहे यात शंकाच नाही. गेल्या ४० वर्षांत पाश्चात्य जगतात खासगीकरण व उदारीकरणाच्या योजनांमुळे अस्थायी स्वरूपात अनेक सामाजिक, तांत्रिक व सांस्कृतिक बदल झालेले आहेत. या बदलांशी व्यक्ती, संस्था व राष्ट्रे कशी जुळवून घेतात, या व्यापक विषयांवर ‘मॅक्स पो’च्या संशोधनाचा भर असेल.

शिष्यवृत्तीबद्दल –
‘मॅक्स पो’च्या या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मात्र शिष्यवृत्तीच्या पहिल्या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांला साधारणपणे १२ आठवडय़ांसाठी शिकवण्याचे किंवा इतर प्रशासकीय काम अर्धवेळ करावे लागेल. शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा २,१०० युरो एवढी असून या रकमेमध्ये विद्यार्थ्यांच्या तेथील निवासासहित इतर सर्व खर्चाचा समावेश आहे. शिष्यवृत्तीबरोबरच या डॉक्टरल स्टडीजसाठी मात्र ‘मॅक्स पो’ने काही मार्गदर्शक तत्त्वे घातली आहेत. उदाहरणार्थ पीएच.डी.चा प्रबंध ‘मॅक्स पो’च्या संशोधन कार्यक्रमानुसार असावा. संशोधनाची व्यापकता केवळ आíथक समाजशास्त्र किंवा राजकीय अर्थव्यवस्था इतक्याच विषयांपुरती सीमित नसावी, तर ती अधिक प्रगल्भ असावी. आíथक समाजशास्त्रातील काही विषय कसे असू शकतात, ते जाणून घेऊया- ‘आर्थिक संकटाचे राजकीय व सामाजिक परिणाम, सामाजिक स्तरीकरण व त्यातील असमानता, अर्थव्यवस्थेच्या नतिक सीमा, आíथक गुन्हेगारी व त्यावर प्रशासनाकडून केले जाणारे निरीक्षण’ इत्यादी.

अर्ज प्रक्रिया –
‘मॅक्स पो’च्या वेबसाइटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली
आहे. शिष्यवृत्तीच्या अर्जासोबत खालील माहिती ई- मेलवर पाठवायची आहे.
 स्वत:चे शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, नोकरी (किंवा व्यवसायाचा) अनुभव इ. बाबींची माहिती देणारा सी.व्ही / रेझ्युमे.
 दोन तज्ज्ञांचे शिफारसपत्र.
 आतापर्यंतची सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्.
 विद्यार्थ्यांची आवड- छंद दर्शवणारे एसओपी (Statement of Purpose)
 पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा संशोधन प्रबंध.
या सर्व माहितीसह अर्जदाराने आपला अर्ज vincent.morandi@sciences-po.fr  या ई-मेलवर पाठवून द्यावा.
ई-मेलच्या विषयात (subject line मध्ये) “MaxPo PhD positions 2013”
असे लिहावे. मात्र याबरोबरच अर्जदाराला ‘सायन्सेस पो’ या संस्थेकडे पीएच. डी.च्या प्रवेशासाठी
४ एप्रिल २०१३ पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवल्यानंतर त्यातून निवडलेल्या अर्जदाराला ऑनलाइन मुलाखतीसाठी पाचारण केले जाईल. अर्जदाराला ठराविक वेळेचे बंधन असेल तर मात्र त्यापूर्वी तसे त्याने आपल्या अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे दुवे –
http://www.maxpo.eu/
E-mail:- vincent.morandi@sciences-po.fr   

शिष्यवृत्तीसाठीची अर्हता
‘मॅक्स पो’ची ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्यवस्थापन अथवा तत्त्वज्ञान यांपकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी असावी. त्याचबरोबर अर्जदाराचे गुणात्मक व संख्यात्मक पद्धतींवर (qualitative and quantitative methods) प्रभुत्व असावे. शैक्षणिक गरजांसाठी संबंधित अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. मात्र अर्जदाराला जर्मन किंवा फ्रेंच भाषेचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे.