भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक वर्गातील १९५७५  पदांची भरती.

स्टेट बँकेच्या मुंबई सर्कलमध्ये मराठी ही अधिकृत भाषा असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी रिक्त पदांचा तपशील :

  • ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)- ५२२ जागा. (खुला गट- १६२, अजा- ७०, अज- ४९, इमाव- १५२, अपंग- २३, माजी सनिक- ६६). पात्रता- पदवी (कोणत्याही शाखेतील).
  • ज्युनियर अ‍ॅग्रिकल्चरल असोसिएट्स- एकूण ३७० पदे (खुला गट- १७०, अजा- ३२, अज- २५, इमाव- ८५, अपंग- ९, माजी सनिक- ४६). पात्रता- पदवी (कृषी आणि संबंधित शाखेतील.) पदवीच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र. त्यांचा निकाल ३० जून २०१६ पर्यंत लागणे आवश्यक. वयोमर्यादा- १ एप्रिल २०१६ रोजी २०-२८ वष्रे (कमाल वयोमर्यादा- अजा/अज- ३३ वष्रे; इमाव- ३१ वष्रे; विधवा/परित्यक्ता महिला खुला गट- ३५ वष्रे, इमाव- ३८ वष्रे, अजा/ अज- ४० वष्रे).

निवड पद्धती- ऑनलाइन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची- पूर्व परीक्षा (१०० गुण), मुख्य परीक्षा (२०० गुण) आणि मुलाखत. अजा/ अज/ माजी सनिक अल्पसंख्याक यांना स्टेट बँक मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या केंद्रांवर पूर्व परीक्षा प्रशिक्षण देणार आहे. याकरता ऑनलाइन अर्ज करताना तसे निर्देशित करावे. परीक्षा शुल्क- रु. ६०० (अजा/अज/अपंग/माजी सनिक यांना रु. १००) ऑनलाइन पद्धतीने अर्ज ६६६. www.statebankofindia.com किंवा www.sbi.co.in या संकेतस्थळावर  २५ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावा.

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापकाच्या २७ पदांची भरती

  • मॅनेजर टेक्निकल (सिव्हिल), मॅनेजर टेक्निकल (इलेक्ट्रिकल). ५ पदे. पात्रता- संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी, ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा- २१-३५ वर्षे.
  • सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा)- ७ पदे. पात्रता- किमान दुसऱ्या वर्गातील पदव्युत्तर पदवी (िहदी/ इंग्रजी/ संस्कृत/अर्थशास्त्र/ वाणिज्य या विषयांतील िहदी/इंग्रजी माध्यमातील पदवी) ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा- २१-३० वष्रे.
  • सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा)- ९ पदे. पात्रता – किमान  ५ वर्षांचा अनुभव असिस्टंट कमांडंट या पदाचा. वयोमर्यादा- २५-४० वष्रे.
  • सहाय्यक ग्रंथपाल- ६ पदे. पात्रता- पदवी  पदव्युत्तर पदवी (लायब्ररी सायन्समधील) ३ वर्षांचा अनुभव. अजा/ अज/ इमाव इ. साठी पद क्र. १ ते ३ आणि ५ साठी कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने २५ एप्रिल २०१६ पर्यंत करावेत. पद क्र. ४ व ५ साठी ऑनलाइन अर्जाची िपट्र आऊट  २ मे पर्यंत आर.बी.आय. भरती बोर्डात पोहोचेल अशी पाठवावी. परीक्षा शुल्क रु. ६०० (अजा/अज/अपंग यांना रु. १००). अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ- www.rbi.org.in

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये राज्यातील उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल/ट्रेड्समनची २८ पदे

राज्यातील उमेदवारांसाठी पश्चिम क्षेत्रातील रिक्त जागा- २८ पदे.

वयोमर्यादा- १८-२३ वष्रे. उंची- १७० सें.मी. (अज- १६२.५ सें.मी.), छाती- ८०-८५ सें.मी. (अज- ७६-८१ सें.मी.)

निवड पद्धती-  पात्रतेच्या अटींची तपासणी.  शारीरिक क्षमता चाचणी- १,६०० मीटर (एक मल) ६ मि. ३० सेकंदांत धावणे, ट्रेड टेस्ट – संबंधित कामाबद्दल ट्रेड टेस्ट द्यावी लागेल. अंतिम निवड ट्रेड टेस्टमधील गुणवत्तेनुसार.

परीक्षा शुल्क- रु. ५० (अजा/अज यांना फी माफ). अर्ज सीआयएसएफच्या www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला नमुना डाऊनलोड करून भरलेले अर्ज डीआयजी/ सीआयएसएफ, वेस्ट झोन हेडक्वॉर्टर्स-१, सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, सेक्टर ३८, खारघर, नवी मुंबई-  ४१०२१० या पत्त्यावर ९ मे २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयात संशोधकांच्या ३२ जागा

उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग अथवा पर्यावरण विज्ञान विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ फेब्रुवारीच्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा envfer.nic.in संकेतस्थळ पाहावे. अर्ज उप सचिव, वन व पर्यावरण मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, अलिगंज, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर १९ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

मिलिटरी इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस अंतर्गत स्टोअरकीपरच्या ८६ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज चीफ इंजिनीअर सिलिगुडी झोन, सिन्हॉक रोड, पोस्ट- सालुगारा, जि. जलपायगुडी- ७३४००८ या पत्त्यावर १९ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, बारामती येथे लेबॉरेटरी टेक्निशियन/ फिल्ड फार्म टेक्निशियनच्या जागा

उमेदवार कृषी विज्ञान, विज्ञान अथवा समाजविज्ञान विषयातील पदवीधर असावेत. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.niam.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संचालक, राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, मालेगाव, खुर्द, बारामती, जि. पुणे- ४१३११५ या पत्त्यावर २१ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

इंडियन नॅशनल सायन्स अकादमी, नवी दिल्ली येथे साहाय्यकांच्या जागा

उमेदवारांनी पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना कार्यालयीन प्रशासन कामाचा ३ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा- २५ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.insaindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, इंडियन सायन्स अकादमी, बहादुर शहा जफर मार्ग, नवी दिल्ली ११०००२ या पत्त्यावर २२ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी येथे कनिष्ठ कारकुनांच्या १० जागा

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ मार्च ते १ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अर्ज डायरेक्टर, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी, विलिंग्डन आयलंड, सीआयएफटी जंक्शन, मत्स्यपुरी पोस्ट ऑफिस, कोचीन- ६८२०२९, केरळ या पत्त्यावर २५ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावा.

केंद्रीय गृह मंत्रालयात टेक्निकल/ फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्टच्या जागा

अधिक माहितीसाठी www.nia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (अ‍ॅडमिन) एनआयए हेडक्वार्टर्स, सातवा मजला, एनडीसीसी २ बिल्डिंग, जयसिंह रोड, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर २५ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावा.