डीआरडीओमध्ये तंत्रज्ञांची व अनुवादकांची भरती 

  • सीनिअर टेक्निकल असिस्टंट : ५६४ जागा- अर्हता- बी. एस्सी./ इंजिनीयरिंग डिप्लोमा.
  • टेक्निशियन : ३४५ जागा – अर्हता- दहावी + आय.टी.आय.
  • ज्युनियर ट्रान्सलेटर : १६ जागा- अर्हता- एम.ए. (इंग्रजी / िहदी). वयोमर्यादा-  पहिल्या व दुसऱ्या पदासाठी २८ वष्रे. तिसऱ्या पदासाठी ३० वष्रे. ऑनलाइन पद्धतीने  drdo.gov.on या संकेतस्थळावर ८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

यूपीएससीतर्फे पदभरती

  • चार्टर्ड अकाऊंटंट/ कॉस्ट अकाऊंटंट – २४ पदे.
  • डेप्युटी आर्किटेक्ट- १३ पदे.
  • सहायक आर्किटेक्ट- २२ पदे.

पात्रता- सीए /आयसीडब्ल्यूए; आर्किटेक्चर पदवी.

वयोमर्यादा- ३५ वष्रे अर्ज ऑनलाइन पद्धतीने  www.upsconline.nic.in  वर ४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत करावेत.

भारतीय तटरक्षक दल येथे जागाभरती

तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्र, मुंबई येथे पुढील पदभरती करण्यात येत आहे-

१. मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर : १४ पदे. नियुक्तीचे ठिकाण, रत्नागिरी. पात्रता -दहावी + हलके/जड वाहन परवाना + २ वर्षांचा  अनुभव.

२.  स्टोअर कीपर : ३ पदे (मुंबई)- पदवी + ३ वर्षांचा अनुभव.

३. असिस्टंट स्टोअर कीपर :३ पदे (मुंबई, रत्नागिरी, कोची)- दहावी + १ वर्षांचा अनुभव.

४. मल्टिटािस्कग स्टाफ (शिपाई /सफाईवाला/चौकीदार/माळी इ. : १२ पदे- (मुंबई, गोवा, रत्नागिरी)- दहावी + २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा- २७ वष्रे विहित नमुन्यातील अर्ज कमांडर,  कोस्ट गार्ड पश्चिमी क्षेत्र, वरळी सी फेस, पो.आ. वरळी, कॉलनी, मुंबई- ४०००३०  या पत्त्यावर साध्या पोस्टाने २१ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, विक्रीकर  निरीक्षक पूर्व परीक्षा 

ही परीक्षा १९ जून २०१६ रोजी होईल. एकूण ६२ पदे (अजा- १ अज- १७, विजा- ५, इमाव- २, खुला- ३७.

पात्रता- पदवी, वयोमर्यादा  १ एप्रिल २०१६ रोजी ३३ वष्रे (मागासवर्गीय ३८ वषेर्.) अर्ज mahampsc.mahonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत करावा.

यूपीएससीची इंडियन इकॉनॉमिक्स सíव्हस/इंडियन स्टॅटिस्टिकल सíव्हस परीक्षा

ही परीक्षा १३ मे २०१६ रोजी घेणार आहे. पात्रता- एम. ए. (इकानॉमिक्स)/ स्टॅटिटिक्समधील पदवी.

वयोमर्यादा- २१ ते ३० वष्रे (अजा/अज २१-३५ वष्रे, इमाव २१-३३ वष्रे). अर्ज ऑनलाइन पद्धतीने  www.upsconline.nic.in वर १२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत  करावेत.

ऑल इंडिया प्री- वेटेरीनरी टेस्ट (ए आय पी.व्ही.टी.) २०१६

नवी दिल्लीच्या वेटेरीनरी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे बी.व्ही.एससी आणि पशुसंवर्धन अभ्यासक्रमाच्या  पदवी प्रवेशासाठी ऑल इंडिया प्री- वेटेरीनरी टेस्ट (ए आय पी.व्ही.टी.) ही प्रवेशपरीक्षा घेतली जाणार आहे.  ही परीक्षा १४ मे २०१६ रोजी होईल. याद्वारे देशस्तरावरील पशुवैद्यक महाविद्यालयांमध्ये १५ टक्के ‘ऑल इंडिया कोटा’च्या जागा भरल्या जातील.  पात्रता – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी या विषयांसह बारावी उत्तीर्ण. वयोमर्यादा – १७ ते २४ वष्रे.(मागासवर्ग १७ ते ३० वष्रे) अर्ज www.aipvt.vci.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने  ७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत विलंब शुल्काशिवाय किंवा १ मार्च २०१६ पर्यंत विलंब शुल्कासहित करावा.

नेहरू सायन्स सेंटरमध्ये तंत्रज्ञांची भरती

मुंबईच्या वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरमध्ये  १० शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. फिटर, इलेक्ट्रिशियन, एसी, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,पेन्टर, वेल्डर, पीएएसएए या पदांकरता प्रत्येकी १उमेदवार आणि सुतार कामासाठी ३ उमेदवारांची निवड करण्यात येईल.  पात्रता- संबंधित कामामधील आयटीआय प्रमाणपत्र आणि दहावी उत्तीर्ण. कालावधी- पहिल्या सात पदांसाठी १ वर्ष आणि आठव्या पदासाठी २ वष्रे. सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना www.nehrusciencecentre.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

भरलेले अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह ५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत संस्थेच्या डॉ. इ. मोझेस रोड, वरळी, मुंबई- ४०००१८ या पत्त्यावर पोहोचतील असे  पाठवावेत.

जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती

मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हे वगळता  राज्यातील सर्व जिल्हा स्तरांवर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या (पुरुष)  १०५९ पदांची भरती करण्यात येत आहे. १. पात्रता- बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष) दहावी विज्ञान विषयांसह उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा- ३३ वष्रे. मागासवर्गीय ३८ वषे.

२. बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष) – दहावी विज्ञान विषयांसह उत्तीर्ण असावेत, त्याचबरोबर राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस काम केल्याचा अनुभव असावा. वयोमर्यादा- ४५ वष्रे ऑनलाइन पद्धतीने पुढील संकेतस्थळावर १० फेब्रुवारी २०१६पर्यंत अर्ज करावेत. www.maharecruitment.mahaonline.gov.in.

सुहास पाटील

 

भाभा अणू संशोधन केंद्र- मुंबईसह विविध अणू संशोधन संस्थांमध्ये प्रशिक्षणासह रोजगार संधी- उमेदवारांनी अभियांत्रिकी- तंत्रज्ञानातील पदवी अथवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांची टक्केवारी किमान ६०% असावी. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा  www.barconlineexam.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

कर्मचारी निवड आयोगाची दिल्ली पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलात साहाय्यक- निरीक्षक निवड परीक्षा-  अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. राज्यातील उमेदवारांनी  आपले अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर  ५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या २९ जागा- अर्जदारांनी भूगर्भशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी, मेकॅनिकल वा पेट्रोलियम इंजिनीअरिंगमधील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा एमईसीएलच्या www.mecl.gov.in at career page स्र्ंॠी या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने  संकेतस्थळावर ५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

सेंट्रल ड्रग्ज रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊ येथे संशोधकांसाठी १४ जागा- अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ डिसेंबर २०१५ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  www.cdriindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

दिल्ली न्यायालयीन निवड सेवा परीक्षेअंतर्गत न्यायाधीशांच्या ९ जागा- अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा www.delhihighcourt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज जॉइंट रजिस्ट्रार (व्हिजिलन्स), दिल्ली उच्च न्यायालय, शेरशहा मार्ग, नवी दिल्ली- ११०५०३ या पत्त्यावर ८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावा.

नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग, दिल्ली अंतर्गत कनिष्ठ कारकुनांच्या ५८ जागा- अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.ncert.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

द. वा. आंबुलकर