अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, हैद्राबाद येथे व्यवस्थापकांमध्ये नेतृत्वविषयक गुण विकसित करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या इंटरनॅशनल पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट फॉर एक्झीक्युटिव्हज या विशेष अभ्यासक्रमासाठी खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.
अभ्यासक्रमाचा कालावधी व स्वरूप- निवासी स्वरूपात असणाऱ्या या अभ्यासक्रमाचा कालावधी १८ महिन्यांचा असून त्यामध्ये एक महिन्याच्या विदेशातील अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमासाठी अधिक माहिती व तपशिलासाठी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडियाच्या http://www.asci-impex.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, बेला व्हिस्टा, राजू भवन रोड, खैरताबाद, हैद्राबाद ५०००८२ (तेलंगण) या पत्त्यावर ३१ जुलै २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’