नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीतर्फे देशांतर्गत विविध संस्थांमध्ये आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने एमएस्सी (हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम घेण्यात येतो. दोन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

*  आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी हॉस्पिटॅलिटी अथवा हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

*  निवड पद्धती: अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा निर्धारित परीक्षा केंद्रांवर १८ जून २०१७ रोजी  सकाळी १० ते १२ च्या दरम्यान घेण्यातयेईल.

अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या पूसा –  दिल्ली, चेन्नई, बंगलोर वा लखनऊ येथे उपलब्ध अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

*  अर्जासह भरावयाचे शुल्क: अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी ९०० रु. (राखीव गटीतल विद्यार्थानी ४५० रु.)

भरणे आवश्यक आहे.

* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क: अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या दूरध्वनी क्र. ०१२० – २५९०६०३ वर संपर्क साधावा अथवा काऊंसिलच्या http://www.thims.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख:  संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०१७ आहे.  हॉटेल वा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विषयातील ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना त्याच क्षेत्रातील पदव्युत्तर पात्रतेसह पुढे करिअर करायचे असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

दत्तात्रय आंबुलकर