युनायटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशनद्वारा २०१७-१८ संशोधन व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी खालील संधी शिष्यवृत्तींसह उपलब्ध आहेत.
फुलब्राईट- नेहरू पोस्ट डॉक्टरल रीसर्च फेलोशिप– शिष्यवृत्तीचा कालावधी २४ महिने.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- ही शिष्यवृत्ती संशोधक- प्राध्यापकांसाठी उपलब्ध असून त्यासाठी अर्जदारांनी गेल्या चार वर्षांत त्यांच्या क्षेत्रात पीएचडी केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
फुलब्राईट नेहरू अ‍ॅकेडेमिक अ‍ॅण्ड प्रोफेशनल एक्सलन्स फेलोशिप– शिष्यवृत्तीचा कालावधी चार ते नऊ महिने.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- ही शिष्यवृत्ती भारतीय संशोधक व प्राध्यापकांना अमेरिकेत संशोधन वा शैक्षणिक सरावासाठी देण्यात येत असून त्यासाठी अर्जदारांनी पीएचडी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
फुलब्राईट कलाम क्लायमेंट फेलोशिप– शिष्यवृत्तीचा कलावधी- ९ ते १२ महिने.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- या शिष्यवृत्तीसाठी भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित विषयात संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
अधिक माहिती व तपशील- वरील शैक्षणिक शिष्यवृत्तींच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.usief.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१६ आहे.

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?