का? कुठे? कसे?

तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल किंवा काही काम असेल तर सध्या इंटरनेटशिवाय पर्याय नाही. परंतु इंटरनेटवर कोणत्याही संकेतस्थळावर जाताना ते संकतेस्थळ सुरक्षित आहे किंवा नाही याची माहिती तुम्ही कशी मिळवाल. यासाठी तुम्हाला एचटीटीपी(http://) आणि एचटीटीपीएस (https://) मधील फरक जाणून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या क्रेडिटकार्ड फसवणुकीच्या पाश्र्वभूमीवर तुम्ही ही माहिती लक्षात ठेवलीच पाहिजे.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
World Heritage Day 2024 Monuments In India
World Heritage Day 2024: ‘हेरिटेज डे’ म्हणजे काय? ‘या’ यादीतील किती ठिकाणांना दिलीये तुम्ही भेट?
worlds clearest water
काचेसारखे पारदर्शक ‘या’ तलावाचे पाणी; पण स्पर्शालाही बंदी! कारण काय…?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन

* एचटीटीपी म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, तर एचटीटीपीएसमधला शेवटचा एस म्हणजे सिक्युअर

*  एखादे संकेतस्थळ एचटीटीपीपासून सुरू होत असल्यास तुम्ही देत असलेली माहिती ही सुरक्षित नसते.

* एचटीटीपीने सुरू होणारे संकेतस्थळ तुमच्या वेब ब्राउजरशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी तुम्ही देत असलेली माहिती कोणीही अनधिकृतरीत्या वाचू शकतं.

*  एचटीटीपीने सुरू होणाऱ्या संकेतस्थळावर जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा अथवा मेल अकाउंटचा संकेतक्रमांक देता तेव्हा ती माहिती कोणीही चोरून वाचू शकते.

* तुमची खाजगी माहिती अथवा एखादा संकेतक्रमांक कुणाच्याही हाती लागल्यास त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

* याउलट एचटीटीपीएसने सुरू होणारे संकेतस्थळ हे सुरक्षित असते. त्यामुळे त्या संकेतस्थळाचा संगणकाशी अथवा

वेब ब्राउजरशी कोणताही संबध येत नाही.

* अशा वेळी तुम्ही दिलेली सर्व माहिती सुरक्षित राहते. ती कुणीही चोरून वाचू शकत नाही.

*  पुढच्या वेळी तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा कोणतीही खाजगी माहिती देत असाल तेव्हा ते संकेतस्थळ एचटीपीपीज्ने सुरू होत आहे ना, याची दक्षता घ्या.