पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या ‘श्रमेव जयते’ या योजनेचा मुख्य उद्देश देशात तरुणांची कुशल पिढी तयार करणे आहे. कामगारांच्या समस्यांकडे उद्योजक आणि व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून न पाहता कामगारांच्याच दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. याशिवाय, कामगारांप्रति असलेल्या सामाजिक दृष्टिकोनातही बदल होणे आवश्यक आहे.

ठळक वैशिष्टय़े

  • श्रम सुविधा म्हणजे ‘युनिफाइड लेबर पोर्टल’. याद्वारे ६ ते ७ लाख उद्योगांना सेल्फ सर्टिफिकेशन आणि सिंगल ऑनलाइन रिटर्न भरण्याची सुविधा मिळेल.
  • कामगारांना पीएफसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) मिळेल. हा नंबर कंपनी बदलली तरी कायम असेल.
  • स्थानिक मागणी आणि आवश्यकतेनुसार निश्चित करून प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल.
  • राष्ट्रीय आरोग्य विमा योजना असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठीही लागू केली जाईल.
  • नव्या श्रम निरीक्षण योजनेंतर्गत श्रम निरीक्षकांना तयार यादी मिळेल, यात त्यांना निरीक्षणासाठी कुठे जायचे आहे, याची माहिती असेल.
  • निरीक्षण पूर्ण केल्यानंतर ७२ तासांत आपला अहवाल वेबसाइटवर टाकावा लागेल.

योजनेंतर्गातील उपक्रम

  • ‘श्रम-सुविधा पोर्टल’ याचा लाभ ईएसआयसी(कर्मचारी राज्य विमा महामंडळ), ईपीएफओ (निवृत्तिवेतन संघटना), श्रमविषयक संस्था-संघटनांना होणार आहे. या योजनेतील कामावर देखरेख करणारे ‘लेबर इन्स्पेक्टर’ याांना संगणकाद्वारे कोणत्या उद्योगांना भेट द्यावयाची माहिती दिली जाईल. तसेच त्यांना त्यांचे अहवालही ७२ तासांत संगणकाद्वारेच सादर करण्याचे (अपलोड) बंधन राहील.
  • सर्व श्रमिक व कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतनासाठी एकच सार्वत्रिक खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकांउंट नंबर) देण्यात येईल. यामुळे नोकरी बदलली तरी त्या कर्मचाऱ्याचा निवृत्तिवेतन निधी सुरक्षित आणि एकाच खात्यात जमा होत राहील. आधीच्या पद्धतीप्रमाणे नोकरी बदलल्यानंतर नव्याने क्रमांक काढणे आणि आधीचा निधी त्यात जमा करण्यासाठी खेटे घालण्याचा त्रास वाचणार आहे.
  • मागणीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये विविध उद्योगांना लागणाऱ्या विविध श्रेणीतील व विशेषत: मध्यम व कनिष्ठ श्रेणीतील कुशल कर्मचारीवर्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील.