devi-ogनवरात्रामध्ये गरबा म्हणजे रास दांडिया हा अलीकडच्या काळात अपरिहार्य भाग झाला आहे. गुजरातमधलं नवरात्रात तसंच इतर धार्मिक उत्सवांमध्ये केलं जाणारं हे पारंपरिक नृत्य आता देशभर लोकप्रिय झालं आहे.

गणपती झाले की वेध लागतात नवरात्रीचे आणि नवरात्र म्हटलं की आठवतो तो नऊ  दिवस खेळला जाणारा गरबा किंवा दांडिया हा नृत्यप्रकार. सगळे जण नवरात्रीमधील रास – दांडियाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. गणपती गेले की नवीन दांडिया, खास रास-गरब्याचे नवीन कपडे आणि गरबा-दांडिया खेळण्यासाठी वाजवली जाणारी गाणी इत्यादी गोष्टींना उधाण आलेले असते.

hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

काही वर्षांपूर्वीपर्यंत गरबा हा सार्वजनिक सण झाला नव्हता. त्यामुळे त्यात पारंपरिक गाणी म्हटली जायची आणि घरगुती किवा फार तर सोसायटीच्या अंगणात गरबा खेळला जात असे. त्याला व्यावसायिक स्वरूप नक्की कधी प्राप्त झाले माहीत नाही. मात्र त्याच वेळी गरब्यामध्ये हिंदी गाण्यांचा समावेश झाला आणि गरबा खेळणाऱ्यांचे पाय त्या गाण्याच्या बोलावर किंवा त्याहीपेक्षा त्याच्या ठेक्यावर थिरकू लागले. या सर्व गाण्यांना एक विशिष्ट लय आहे जी गरबा-दांडियाच्या गाण्यांसाठी गरजेची असते तसेच या गाण्यांचा एक ठरावीक ‘पॅटर्न’ असतो. त्या पद्धतीनेच ती गाणी वाजतात आणि त्यावर नृत्य केले जाते. गरब्यामध्ये वाजली जाणारी ७० टक्के गाणी सहा ते आठ पॅटर्नमध्ये बसतात ज्याला सामान्यपणे खेंटा ताल असे संबोधले जाते. या तालातील गाणे म्हणजे ‘हे नाम रे.’ तसेच अजून एक वेगळा ताल ‘मटूकडी ताल’ या नावाने ओळखला जातो.

गरब्यात वाजणारी गाणी मोजायची म्हटली तर ती संख्या फारच मोठी होईल. परंतु तरीही सगळीकडे वाजणाऱ्या आणि सर्वमान्य असणाऱ्या गाण्यांची यादी करायची झाली तर ही गाणी अगदी सहजपणे आठवतात.

हिंदी चित्रपटगीतांपैकी ‘सुहाग’ या चित्रपटातील अमिताभ आणि रेखावर चित्रित करण्यात आलेलं ‘हे नाम रे’  हे गाणं आज २०१५ सालातही आवर्जून आठवतं; किंबहुना हे गाणं वाजल्याशिवाय गरबा पूर्णच होत नाही असं म्हटलं तरी चालेल. संजय लीला भन्साळी आणि गरब्याचं गाणं हेसुद्धा एक समीकरण आहे. ‘ढोलीतारो ढोल बाजे’ हे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील सलमान खान आणि ऐश्वर्या रायवर चित्रित झालेलं गाणं, याच चित्रपटातील ‘निंबुडा  निंबुडा’ हे गाणं, रामलीला चित्रपटातील ‘नगाडे संग ढोल बाजे’ ही गाणी तर विशेष गाजली. ‘ये जवानी है दिवानी’ यातील ‘घागरा’ तसेच आजा नचलेचं शीर्षक गीत, मै प्रेम की दिवानी हूँ मधील अनू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं ‘बनी बनी  दिवानी बनी’, काय पोचे मधील ‘हे शुभारंभ ‘ही गाणीही गरब्यासाठी लोकप्रिय आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधलं ‘राधा तेरी चुनरी’ हे गाण्यालाही मागणी आहे. परी हूँ मै (सुनीता राव), डिस्को दांडिया (लव लव), हाय रे हाय तेरा घुंगटा (ढोंगी- रणधीर कपूर व नीतू कपूर), ओ रे गोरी (आप मुझे अच्छे लगने लगे), जय अंबे जगदंबे मा (क्रांतिवीर), घुंघट की आड से दिलबर का, सासों की जरूरत है (आशिकी),  आणि मराठीतील-नवीन पोपट हा, अरे मन मोहना कळली देवा तुला राधिका रे राधिका ( बाळा गाऊ  कशी अंगाई), उधळीत येरे गुलाल सजणा (गंमतजंमत) यासारख्या  गाण्यांनी सध्याचा गरबा सजतो.

खरंतर ‘रास अथवा ‘गरबा’ हे गुजरातमधील एक प्रसिद्ध लोकनृत्य. नवदुर्गेच्या पूजेच्या प्रसंगी व इतर धार्मिक सणासुदीला तेथील स्त्रिया हे नृत्य करतात. आपल्याकडे ज्याप्रमाणे भोंडला घरगुती स्वरूपात खेळला जातो तसाच गुजरातमध्ये गरबा खेळला जात असे. मुंबई-पुणेसारख्या मोठय़ा शहरांमध्ये नवरात्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या या रास दांडियाचे मात्र फारच वेगळे चित्र बघायला मिळते. आजचा गरब्याचा ट्रेंड काय आहे? सोसायटीच्या अंगणात, शाळेच्या मैदानावर तर काही ठिकाणी चक्क थोडा आजूबाजूचा रस्ता अडवून गरबा खेळला जातो. शहरात मोठय़ा मोठय़ा मैदानांवर गरबा अथवा दांडिया आयोजित केला जातो. त्यासाठी कमीत कमी शंभर रुपयांपासून ते अगदी पाच/दहा हजारांपर्यंत तिकीट मोजावे लागते. अनेक उत्साही तरुण-तरुणी यात भाग  घेतात. या काही ठिकाणी गाण्यांच्या रेकॉर्डवर गरबा चालतो तर बहुसंख्य ठिकाणी लाइव्ह ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला असतो. वर उल्लेख केलेली सर्व गाणी हे गायक आणि गायिका एका वेगळ्याच ढंगात पेश करतात. आणि समोरच्या मैदानात अक्षरश: शेकडो तरुण-तरुणी बेधुंद होऊन यावर नाचत असतात. आणि जवळपास तेवढीच माणसे गोल उभी राहून पहातही असतात. यातील काही गरब्यांचे स्थानिक केबलवर प्रसारणही केले जात असते. मात्र या सगळ्यांमध्ये रंगमंचावर जे गायक व वादक चारपाच तास आपलं काम चोख बजावत असतात त्यांना सलाम!!! आपण खेळामध्ये दंग असतो -दमल्यावर थोडी विश्रांती घेतो, पुन्हा खेळ सुरू करतो. परंतु रंगमंचावरील हे कलाकार मात्र एकदा सुरू झाले की थांबत नाहीत. त्यांना ‘विश्रांती-(ब्रेक)’ घेण्याची परवानगी नसते. अर्थात तेही संगीताचा आनंद लुटत असतात. त्यामुळे मानसिक दृष्टय़ा त्यांना तो थकवा नक्कीच जाणवत नसावा.

आता गरब्यामध्येसुद्धा विविध गट पडायला सुरुवात झाली आहे. सेलिब्रेटींचा गरबा असतो, टीव्हीवरील विविध कलाकारांचा गरबा असतो. काही ठिकाणी या कलाकारांना खास खेळण्यासाठी पाचारण केले जाते. या क्षेत्रातील अजून एक वजनदार नाव म्हणजे ‘फाल्गुनी पाठक’. गरबा-दांडिया आणि फाल्गुनी पाठक हे एक समीकरणच आहे. केसांची विशिष्ट प्रकारची रचना, ठरावीक पद्धतीचा शर्ट-पँट असा पेहराव केलेली फाल्गुनी पाठक बघताक्षणी समोरच्याच्या मनात एक स्थान निर्माण करते. ‘मैने पायल है छनकाई.’, ‘चुनरी उड उड जाए.’, ‘चुडी जो खनकी हाथों में.’ं, ‘ओ पिया ओ पिया लेके डोलिया’, ‘सावरिया तेरे याद में’पासून अगदी गुजराती पारंपरिक गरब्याच्या गाण्यांपर्यंत फाल्गुनी पाठक गाऊ  लागते तेव्हा आपोआप आपलीही पावले त्या ठेक्यावर नृत्य करू लागतात. फाल्गुनी पाठक आणि रास गरबा या समीकरणासाठी हजारो तरुण-तरुणी या उत्सवाची वाट बघत असतात. आणि कितीही पैसे मोजून तिच्या दांडियात आपला प्रवेश करून घ्यावा यासाठी तयार असतात.

हल्ली हा एक खूप मोठा इव्हेंट झाला असल्याने अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा यात शिरकाव झाला आहे. त्यामुळे यात खूप मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्या सोबतच अनेक गैरप्रकारही या काळात घडत असतात. अर्थात यासाठी पालकांनी खूप सावध राहणे गरजेचे आहे. आता बऱ्याच ठिकाणी निवडणुकांचा हंगाम असल्याने यावर्षी गरब्याला एक वेगळाच ‘रंग’ प्राप्त होणार आहे. गरब्याचे आयोजक आणि राजकीय पक्ष दोघेही जण याचा आपल्याला फायदा कसा करून घेता येईल या एकाच विचाराने प्रेरित झाले असतील. असा हा गरबा किंवा दांडिया काही काळाने आपला राष्ट्रीय सण झाला तर नवल वाटायला नको.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com