एकीकडे सातव्या वेतन आयोगावरून केंद्र सरकारचे कर्मचारी नाराज असताना दुसरीकडे काँग्रेसनेही ही वेतनवाढी निराश करणारी असल्याचे म्हटले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात कमी वेतनवाढ असल्याची टीका काँग्रेसने केली.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले, मूळ वेतनावर केवळ १५ टक्के वाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून जरी २३.५ टक्के वेतनवाढ असल्याचे सांगितले जात असले तरी तो आकडा फसवा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना इतकी कमी वेतनवाढ मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती नाही, हेच यातून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा : सातव्या वेतन आयोगामुळे १५ ते २० हजार कोटींचा बोजा
आतापर्यंतच्या काँग्रेसने कायम कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचेच निर्णय काँग्रेस पक्षाने घेतले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.