मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
अरविंद केजरीवाल आणि 'ड्रामा क्वीन' राखी सावंत हे सारखेच आहेत. दोघेही सतत दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, या दोघांकडेही दाखवण्यासारखे काहीच नाही, असे ट्विट दिग्विजय सिंग यांनी केले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने आपल्याला एसएमएस पाठवला असून, मी हे ट्विट करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही, असं आज (रविवार) काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह म्हणाले.
दरम्यान, आपल्या या वक्तव्यानंतर दिग्विजय सिंग यांनी राखी सावंतची माफीसुध्दा मागितली आहे. मी राखी सावंतचा जुना चाहता आहे, पण केजरीवाल यांच्याशी तुझी (राखी सावंत) तुलना केल्याने मी माफी मागतो, असेही ट्विट त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी दिग्विजय यांनी केजरीवाल यांना हिटलरची उपमा दिली होती.
शनिवारी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांनी केजरीवाल यांना मच्छर म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी 'मी डेंगीचा मच्छर' असल्याचे म्हटले होते. मी कॉंग्रेस आणि भाजपचा चावा घेणार असून त्यानंतर ते संकटात सापडतील असंही, केजरीवाल उत्तरादाखल म्हणाले होते.




















कॉंग्रेसवाल्यांनो अस्भ्य्तेलाही मर्यादा असतात. तुमचे हे प्रवक्ते म्हणे राखी सावंतचे चाहते. कॉंग्रेसची संस्कृती किती खालावली आहे ह्याची प्रचीती आली. किती हे असभ्य!
हेच असभ्य पक्शाधक्ष निवडतात, हेच असभ्य पंतप्रधान निवडतात, हेच असभ्य राष्ट्रपतींना निवडून देतात, हेच राष्ट्रपती न्यायाधीशांची नेमणूक करतात, तिन्ही सेनाध्यक्ष ह्यांना मानवंदना देतात.
आम्ही ७५ कोटी भारतीय मतदार ह्या असभ्यांना निवडून देतो. सारेची असभ्य. मग सभ्य कोण? कोणी स्पष्टीकरण देईल?