मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जितके लोकप्रिय होते, तितकेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही लोकप्रिय असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी बुधवारी व्यक्त केले.
कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी सिंघल येथे आले आहेत. नेहरूंनंतर संपूर्ण देशभरात त्यांच्या इतकीच लोकप्रियता मिळवणारा नेता पहिल्यांदाच दिसतो आहे, या शब्दांत सिंघल यांनी मोदी यांचा गौरव केला. पंतप्रधानपदासाठी मोदी यांना उमेदवारी द्यावी, यासाठी हिंदूत्त्ववादी संघटनांनी भारतीय जनता पक्षावर दबाव टाकला आहे. त्याचवेळी सिंघल यांनी मोदी यांच्या कामाचा जाहीरपणे गौरव केला. मोदी यांच्या उमेदवारीसाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, देशातील हिंदूंना त्यांच्या योग्यतेचे काम मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू परिषद बांधील आहे.
भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह हे बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी सिंघल यांनी मोदी यांचे कौतुक केले, हा केवळ योगायोग नक्कीच नाही.
आम्हाला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. आम्ही केवळ हिंदू समुदायाच्या कल्याणाचा विचार करतो, असेही सिंघल यांनी स्पष्ट केले.




















ज्या नेत्यावर्ती दंगलीचे आरोप आहेत असे नेते जर देश्याच्या महत्वाच्या पदावरी असेल तर ते देशालच्या प्रतिमेलाच प्रश्नचिन्ह निर्माण होतात..
आपला देश हा अनेक धर्म, जातींच,संस्कृतींचा वारसा संगती घेऊन जिवंत आहे , ज्याने राष्ट्रीय अखंडता पडलेली आहे.. त्यामुळे विशिष्ट धर्माविषयी आपला विचार नेहमी व्यक्त करणारा नेता देशाच्या देशात राष्ट्रीय अखंडता किती टिकवू शकतो हे देखील महत्वाचे आहेत…