मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली- पृथ्वीराज चव्हाण
- खुनी नव-यापासून पत्नीने घेतला घटस्फोट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
- पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत पुष्पगुच्छाने स्वागत
- लातूर, औसा, रेणापूरमध्ये काढला ४५ कोटींचा गाळ
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीने भारतात उद्योग वाढवण्यासाठी लॉबिंग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेच्या किमान १५ कंपन्या व त्यांच्या उपकंपन्यांनी यावर्षी लॉबिंगवर लाखो डॉलर खर्च केले असल्याचे समजते.
ज्या अमेरिकी कंपन्यांनी भारतात उलाढाल वाढवण्यासाठी लॉबिंग केले त्यांच्यात औषध कंपनी पीफायजर, संगणक कंपनी डेल व एचपी, दूरसंचार कंपन्या क्वालकम व अलकाटेल-ल्युसेंट, आर्थिक सेवा कंपन्या मॉर्गन स्टॅन्ले व प्रुडेन्शियल फायनान्शियल, एरोस्पेस इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ अमेरिका, ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणारी कारगिल व कोलगेट पामोलिव्ह या कंपन्यांनी भारतात लॉबिंग केले असे अमेरिकी काँग्रेसच्या नोंदीत दिसून आले आहे. बोईग, एटी अँड टी, स्टारबक्स, लॉकहीड मार्टिन, एली लिली व जीई या कंपन्यांनीही भारतात उद्योग वाढवण्यासाठी लॉबिंग केले आहे.
अमेरिकी सिनेट व काँग्रेसला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार फायनान्शियल एक्सिक्युटिव्ह इंटरनॅशनल, बिझीनेस राउंडटेबल, बिझीनेस सॉफ्टवेअर अलायन्स व फायनान्शियल सव्र्हिसेस फोरम या कंपन्यांनी करनिर्धारण व अर्थ विधेयकातील तरतुदींसाठी लॉबिंग केले आहे. क्वालकॉम कंपनीने स्पेक्ट्रम परवान्यासाठी, अल्काटेल-ल्युसेंट कंपनीने अग्रक्रमाने बाजारपेठ प्रवेश, पीफायजरने सर्वोच्च न्यायालयाने जेनरिक औषधांच्या किमतीबाबत दिलेला निर्णय व पेटंट संदर्भात लॉबिंग केले. अलायन्स ऑफ अॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेनेही कार्बन उत्सर्जन प्रमाणाच्या मुद्दय़ावर तर प्रुडेन्शियल फायनान्सने भारतीय बाजारपेठेत प्रवेश व समभाग मालकीसाठी लॉबिंग केले.
कंपनी लॉबिंगवरचा खर्च
प्रुडेन्शियल फायनान्शियल ६० लाख डॉलर
मॉर्गन स्टॅन्ले २० लाख डॉलर
बिझीनेस राउंडटेबल ६६ लाख डॉलर
अलायन्स ऑफ अॅटोबोमाबाईल मॅन्युफॅक्सर्स ८० लाख डॉलर
डेल २० लाख डॉलर
एचपी १५ लाख डॉलर
कारगिल १० लाख डॉलर
एरोस्पेस इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ अमेरिका २० लाख डॉलर
वॉलमार्ट २.५ कोटी डॉलर
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा

















