चेन्नईनजीकच्या पोरूर येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या मदतीत तामिळनाडू सरकारने वाढ केली आहे.
या दुर्घटनेत मरण पावलेल्या आंध्र प्रदेशातील बळींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तामिळनाडूतील चौघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना जयललिता यांनी प्रथम दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र आता त्यांनी त्यामध्ये पाच लाख रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून सात लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
युद्धपातळीवर मदत -नायडू
चेन्नईत इमरात कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेट घेतली आणि त्यांना युद्धपातळीवर मदत करण्याचे आणि वैद्यकीय उपचार देण्याचे आश्वासन दिले. या दुर्घटनेत मृत अथवा जखमी झालेल्यांपैकी काही जण आंध्र प्रदेशातील आहेत. श्रीहरीकोटा येथून नायडू चेन्नईला गेले होते.