पश्चिम दिल्लीतील उत्तमनगर भागात दहावीतील मुलीवर पाचजणांनी बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यांच्यामध्ये तीन अल्पवयीन आहेत. आरोपींनी बलात्काराच्या घटनेचा एमएमएस करून तो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली, अशी तक्रार या मुलीने केली.
याप्रकरणी, एक सज्ञान व दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली. मुलीच्या कुटुंबीयांनी पाचजणांविरुद्ध तक्रार दिली आहे. ही घटना १९ जुलैस घडली असून मुलगी शाळेत जात असताना हा प्रकार झाला. मुलीने पोलिसांना सांगितले की, तीन अल्पवयीनांसह चारजणांनी आपल्याला झारोडा भागात सुरेंदर पेहलवान याच्या घरी नेले व तेथे पाचजणांनी बलात्कार केला. पेहलवान आपण पोलीस अधिकारी आहोत असे सांगत होता व त्याने पोलीस असल्याचे ओळखपत्रही आपल्याला दाखवले. नंतर त्रास होऊ लागल्यानंतर तिने याबद्दल आई-वडिलांना सांगितले व नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली.