गुजरात विधानसभेने संमत केलेल्या वादग्रस्त दहशतवादविरोधी कायद्याला मंजुरी देऊ नये, अशी जोरदार मागणी काँग्रेसने शनिवारी राष्ट्रपतींना भेटून केली. यापूर्वी तीन वेळा या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळू शकलेली नाही.
गुजरात दहशतवाद आणि संघटित गुन्हे नियंत्रण विधेयक विधानसभेने पारित केल्यानंतर राज्यपालांनी त्याला मान्यता देऊन केंद्रीय गृहमंत्रालय व राष्ट्रपती यांच्या मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवले आहे. काँग्रेसाध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी आणि विरोधी पक्षनेते शंकरसिंग वाघेला या गुजरातमधील नेत्यांनी कायद्याच्या विरोधात बाजू मांडण्यासाठी पक्षाच्या आमदारांसह राष्ट्रपतींची भेट घेतली.