सोशल मीडियाद्वारे रचलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकून भारतीय लष्कराबद्दलची गोपनीय माहिती पाकिस्तानी हस्तकाला पुरविणाऱ्या भारतीय सैन्यात हवालदार पदावर असणाऱ्या जवानाला कोर्ट मार्शलच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हवालदार संजय कुमार यादव हा भारतीय सैन्याच्या झाशी येथील ३१ तोफखाना विभागात कार्यरत होता. सोशल मिडीयावरून महिला असल्याची बतावणी करून पाकिस्तानी हस्तकाने संजय कुमारकडून भारतीय लष्कराबद्दलची गोपनीय माहिती काढून घेतली होती. या महिलेने संजय कुमारला आपल्या जाळ्यात ओढले होते. या दोघांनी एकमेकांना स्वत:ची छायाचित्रेही पाठविली होती. याशिवाय, संजय कुमारच्या चौकशीत त्याच्या बँक खात्यात १ लाख ३८ हजार रूपये जमा झाल्याचेही उघडकीस आले होते. संजय कुमार तब्बल नऊ महिने या पाकिस्तानी हस्तकाच्या संपर्कात असल्याचेही निदर्शनास आले होते. या काळात संजय कुमारने या महिलेला भारतीय लष्कराच्या तळांची आणि लष्करी नियुक्त्यांची माहिती दिली होती. चौकशीदरम्यान त्याच्यावरील सर्व आरोप सिद्धही झाले होते. त्यामुळे आता संजय कुमारवर कोर्ट मार्शलची कारवाई होणार असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबरपासून या कारवाईला सुरूवात झाली आहे. या कोर्टमार्शलसाठी इंन्फ्रन्ट्री बटालियनच्या एका अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या जनरल कोर्टमार्शल समितीकडून (सीजीएम) हेरगिरीचे हे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे.

यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्ये भटिंडा आणि पठाणकोट येथील भारतीय हवाई दलातील दोन अधिकाऱ्यांनाही हनीट्रॅपमध्ये अडकून माहिती पुरविल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.  यापैकी रणजित के.के. भारतीय हवाई दलात भटिंडा येथे काम करीत होता. तो मूळ केरळातील मल्लापुरमचा असून भारतीय हवाई दलात २०१० मध्ये दाखल झाला होता. त्याच्यावर कार्यालयीन गोपनीयता कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेने सीमेवरील एक हेरगिरी जाळे उघड झाले असून महिला असल्याची बतावणी करून समाज माध्यमांवर खाते उघडून जाळयात ओढले जात होते. या प्रकरणात रणजित याला दामिनी मॅकनॉट या ब्रिटनमधील माध्यम अधिकारी असलेल्या महिलेच्या बनावट नावाने काम करणाऱ्या एकाने फसवले, हवाई दलाची माहिती आमच्या नियतकालिकाला हवी आहे असे सांगून त्याच्याकडे माहिती मागण्यात आली. त्यानेही हवाई दलातील ताज्या घडामोडींची माहिती दिली व त्याच्या खात्यात पैसे जमा झाले होते.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी