अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नावर कर्नाटक सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून महिलांसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. राज्यातही अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी या हेल्पलाइनचा उपयोग होणार आहे. तर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला कडक शिक्षा आणि त्याचे खच्चीकरण करण्यासंबंधी राज्यात कायदा करण्यात यावा, अशी मागणी ऊर्जामंत्री शोभा करंदलाजे यांनी केली आहे.