ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला-सादिया सेतूचे उद्घाटन

आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या, तब्बल सव्वानऊ किमी लांबीच्या ढोला-सादिया पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. पंतप्रधानांनी हा पूल देशाला अर्पण केला. या पुलामुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आसाम व तिथून पुढे देशभर पाठविण्यास मदत होणार असून भविष्यात ईशान्य भारताचा र्सवकष विकास सांधणारा हा सेतू ठरेल, असा आशावाद पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. प्रख्यात आसामी गायक भूपेन हजारिका यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे.

पुलाची वैशिष्टय़े..

  • लांबी : ९.१५ किमी
  • वांद्रे-वरळी सागरी सेतूपेक्षा ३.५५ किमीने जास्त लांब
  • खर्च : दोन हजार कोटी रुपये
  • आसाम-अरुणाचलमधील अंतर १६५ किमीने कमी
  • हा प्रवास सात ते आठ तासांनी कमी होणार
  • अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाभागात लष्कराला तातडीने रसद पुरवण्यासाठी उपयुक्त
  • ईशान्येकडील दळणवळणात महत्त्व
  • ईशान्येकडील उत्तम प्रतीच्या आल्याला नवी बाजारपेठ उपलब्ध होणार