रशिया व पाकिस्तान यांच्या सैन्याच्या संयुक्त कवायती उद्यापासून सुरू होत आहेत. दोन्ही देशात अशा कवायती प्रथमच होत असून त्यात शीतयुद्धातील माजी प्रतिस्पध्र्याची मैत्री अधोरेखित झाल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असीम बजवा यांनी सांगितले की, रशियाच्या भूदलाची तुकडी पाकिस्तानात दाखल झाली आहे. रशियाच्या सैन्य तुकडय़ा २४ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान पाकिस्तानात राहणार असून दोन्ही देशांचे किमान दोनशे सैनिक या कवायतीत सहभागी होतील. फ्रेंडशीप २०१६ मोहिमेत या कवायती होत असून दोन्ही देशातील माजी प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत. रशिया व पाकिस्तान यांचे संरक्षण संबंध चांगले असून पाकिस्तान रशियाची प्रगत विमाने खरेदी करण्याच्या विचारात आहे.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
For the third day in Russia mourn the death of Alexei Navalny
रशियात नागरिकांमध्ये वाढता आक्रोश
Talks between Muslim League Nawaz and Bilawal Bhutto Zardari led Pakistan People Party failed
पाकिस्तानात सरकार स्थापनेची चर्चा निष्फळ

दोन्ही देशातील लष्करात वाढत्या सहकार्याचे हे प्रतीक असून त्यात दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधही शीतयुद्धोत्तर काळात सुधारल्याचे दिसून येते. पाकिस्तानने परराष्ट्र धोरण पर्याय विस्तारले असून त्यांचे अमेरिकेशी संबंध सीआयएने ओसामा बिन लादेनला अबोटाबाद येथे मे २०११ मध्ये ठार केल्याच्या कारवाईने बिघडले होते. अमेरिकेबरोबरचे पाकिस्तानचे संबंध काही सदस्यांनी एफ १६ विमानांसाठी पाकिस्तानला मदत नाकारल्याने आणखी घसरले. पाकिस्तानने याला पर्याय महणून जॉर्डनकडून विमाने खरेदी करण्याचे ठरवले आहे.  गेल्या पंधरा महिन्यात पाकिस्तानी लष्कर व नौदल यांच्या प्रमुखांनी रशियाचा दौरा केला होता. दोन्ही देशात एम आय ३६ लढाऊ विमानांच्या विक्रीचा करार त्यानंतर झाला. ऑगस्ट २०१५ मध्ये त्याबाबत अधिकृत विक्री करार झाला, त्यामुळे अमेरिका-भारत संबंधामुळे रशियाचे पाकिस्तानविषषयक धोरण बदलल्याचे स्पष्ट झाले होते.  रशियाकडून एसयू ३५ विमाने घेण्याचा पर्यायही पाकिस्तान अजमावत आहे त्यासाठी हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल सोहेल अमन यांनी जुलैत मॉस्कोला भेट दिली होती.